बीड -गेवराई शहरातील बसस्थानक परिसरातील ( Gaverai sexual assault ) एका ( ७० वर्षिय ) वयवृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार ( Sexual assault on women ) झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच ही घटना मध्यरात्री ३ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे .
Gaverai Sexual Assault : गेवराईच्या नविन बस स्थानक परिसरात महिलेवर लैंगिक अत्याचार - Woman sexually assaulted
गेवराईच्या नविन बस स्थानक परिसरात 75 वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार ( Sexual assault on women ) करण्यात आला आहे. गेवराई बसस्थानक परिसरातील ही घटना घडली ( Gaverai sexual assault ) आहे. गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
वयवृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार -बसस्थानक परिसरात एक ७० वर्षिय वयवृद्ध महिला ( Sexual Assault near Gevrai Bus Stand ) फळ विकून आपली उपजिविका भागवते व त्याच ठिकाणी राहते याचं संधीचा फायदा घेऊन मध्यरात्री ३ वाजता एका नराधमाने या वयवृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार केला आहे. तसेच या पिडीतेला जबर मारहान देखिल केली आहे. ही घटना बसस्थानक परिसरात घडली आहे याठिकाणी एकही सिसिटिव्ही चालू नाही हे दूर्दैव आहे.
आरोपी अद्याप फरार -सिसिटिव्ही बंद असल्याने नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तसेच आरोपी अद्याप फरार असुन या पिडीतेवर गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच पोलिस अधिकारी देखील याठिकाणी उपस्थित आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.