पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वॉटर कप स्पर्धेतील गावात केले श्रमदान - hingani
बीड जिल्ह्यातील दुष्काळ दौऱ्यावर असतानाच पंकजा मुंडे यांनी काही चारा छावणीला भेट देऊन पशुमालकांशी संवाद साधला.
पंकजा मुंडेंनी केले श्रमदान
बीड - तालुक्यातील हिंगणी बु. येथे सुरू असलेल्या वॉटर कपच्या कामावर मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी श्रमदान केले. यावेळी माजी सरपंच अंकुश गोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन मुंडे यांनी केले. बीड जिल्ह्यातील दुष्काळ दौऱ्यावर असतानाच पंकजा मुंडे यांनी काही चारा छावणीला भेट देऊन पशुमालकांशी संवाद साधला.