महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये गँगवार ; किरकोळ कारणावरून भरचौकात गोळीबार, 4 जण जखमी - गोळीबारात चारजण जखमी

दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून हाणामारी झाली आणि नंतर या हाणामारीचं रूपांतर थेट गोळीबारात झाले. गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.

बीडमध्ये गोळीबार
बीडमध्ये गोळीबार

By

Published : Jun 17, 2023, 2:32 PM IST

बीड : शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढू लागली आहे. अशात शहरातील नगर रोड रस्त्यावरील कालिंका नगर भागामध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली. घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली. या भागातील दोन गटात वाद झाला यानंतर एका गटाकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारमध्ये चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आसाराम गायकवाड नामक व्यक्तीला अटक केली आहे.

गोळीबारात चार जखमी : कालिंका नगर भागातील नगद नारायण बँकेसमोर दोन गटात वाद झाला. साधरण 70 ते 80 जणांमध्ये हाणामारी झाली. यातील एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. या गोळीबारमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. त्यांना जगन्नाथ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आसाराम गायकवाडच्या गटाने गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोळीबार प्रकरणी आसाराम गायकवाड यांना अटक केली आहे. दरम्यान दोन गटात कोणत्या कारणामुळे वाद झाला ते कारण अद्याप समजलेले नाही. गोळीबार झाल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details