बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माजलगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड परिसरात सालगडी म्हणून काम करते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आई वडील शेतात कामाला गेले असताना आरोपी बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळ याने पीडित मुलीला एका उसाच्या फडात ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने अत्याचार ( Gang raped on minor girl ) केला. एका महिलेने ही सदर घटना घडत असताना पीडित मुलीचे अश्लील फोटो काढले. ( Beed Crime )
Beed Crime : धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर 3 जणांनी केला सामूहिक बलात्कार - सामूहिक बलात्कार
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कुटुंबातील मुलीवर बलत्काराची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडील शेतात गेले असताना एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ( Gang raped on minor girl ) झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, दरम्यान दिंद्रुड पोलिसात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींविरोधात गुन्हे दाखल : सदर पीडित मुलगी ही सतरा (17)वर्षाची अल्पवयीन आहे. शुक्रवारी झालेल्या घटनेमुळे दिंद्रुड व परिसरात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात एका महिलेसह उपरोक्त चार जणांवर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटी, नुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींना अटक : दरम्यान, दिंद्रुड पोलीस स्टेशनला पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस डॉ.धीरज कुमार बच्चू यांनी भेट देत आरोपी विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना तात्काळ जेरबंद केले. सदर कारवाई दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, युवराज श्रीडोळे, विशाल मुजमुले,मुकेश शेळके,रेवण दुधाने आदींनी केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास डॉ धीरजकुमार बच्चू करत आहेत.