बीड : गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात यंदा मात्र एक वेगळी चर्चा सुरु आहे. या कृषी महोत्सवात गजेंद्र नावाचा रेडा हा मुख्य आकर्षण ठरत आहे. ज्याचे वजन हे दीड टन असून त्याला दीड कोटींची मागणी आहे. विशेष म्हणजे या गजेंद्रला पाहण्यासाठी शेतकरी मोठी गर्दी करत आहेत.
तब्बल 180 स्टॉल :कृषिरत्न स्व. गणेशराव बेद्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ, दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या कृषी महोत्सवातील प्रदर्शनासाठी, तब्बल 180 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये शेतकरी उपयोगी सर्व साहित्यांसह विविध उपकरणे असणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यात पशुधन आणि दुग्ध विषयक शेती करण्यासाठी आवड निर्माण व्हावी, यासाठी मुख्य आकर्षण म्हणून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील गजेंद्र रेडा देखील आणण्यात आला आहे. अशी माहिती आयोजक महेश बेंद्रे यांनी दिली.
काय म्हणतात रेड्याचे मालक :हा रेडा पंजाब या ठिकाणी दीड कोटीला मागत आहेत. त्याचे वजन दिड टन आहे रोज त्याला पंधरा लिटर दूध व तीन किलो सफरचंद खाऊ घालत आहोत. त्याचबरोबर त्याला दररोज लागणारा चाराही वेगळा दिला जातो. 2 किलो आटा 3 किलो पेंड, खाऊ घालतो व त्याच्यापासून उत्पन्न म्हटले तर एका म्हशीला दोन हजार रुपये घेतो दररोज आमच्याकडे पाच म्हशीच्या दररोज दहा हजार रुपये पण रेड्याचे वजन जास्त झाल्याने आता त्यालाही त्याचा त्रास होतो व एक किंवा दोनच म्हशी लावण्यासाठी येतात. आमच्याकडे घरामध्ये 50 म्हशी आहेत आणि त्याचे शंभर ते दीडशे लिटर दूध निघत आहे. चार पाच हजार रुपये येतात त्याच्यातूनच त्याला उत्पन्नातून याला खाऊ घालत आहोत. आम्ही तो हरियाणामध्ये देणार आहोत. मेल्यानंतर तो चार-पाच कोटीला विकला जाईल अशी आमची मागणी आहे.