बीड -राजस्थानमधील जैसलमेर येथे युध्द् सरावादरम्यान धारुर तालुक्यातील घागरवडा येथील परमेश्वर बाळासाहेब जाधवर यांना वीरमरण आले आहे. परमेश्वर जाधवर यांचे पार्थिव गुरुवारी त्यांचे मूळ गाव घागरवाडा येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, धारुरचे नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी, आमदार प्रकाश सोळुंके, तहसीलदार एस. व्ही. शेडोळकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार केशवराव आंधळे, रमेश आडसकर, पोलीस निरीक्षक विश्वास नाईकवाडे, नायब तहसीलदार सुहास हजारे, रामेश्वर स्वामी, गटविकास अधिकारी सोपान अकेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींनी जाधवर यांना श्रध्दांजली वाहिली.