बीड - जिल्ह्यातील निधी लेखा परीक्षक कार्यालयातील सहाय्यक संचालकाला वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. किरण सुरेश घोटकर असे त्या अधिकार्याचे नाव आहे. उस्मानाबाद येथील स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयाचा देखील किरण घोटकर याच्याकडे अतिरिक्त पदभार आहे.
बीड: 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक संचालकाला रंगेहाथ पकडलं - 20 thousand bribe in beed
निधी लेखा परीक्षक कार्यालयातील सहाय्यक संचालकाला वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
पंचायत समिती पाटोदा तसेच पंचायत समिती वडवणीचे लेखा परीक्षण मुदतीत पूर्ण करून तो अहवाल मेन्स प्रणालीवर अपलोड करण्यात आला आहे. सदरचा अहवाल अंतमीकरण करून प्रकाशित करण्यासाठी किरण घोटकर याने 40 हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागात आली. तेव्हा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी साफळा रचत किरणला वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत गोरे, प्रदिप वीर, मनोज गदळे, चालक गणेश म्हेत्रे यांनी ही कारवाई केली.