परळी वैजनाथ (बीड) - मौजे मालेवाडी गावातील वीज वारंवार खंडित होत असल्याने पोलवरची विद्युत तार काढून केबलद्वारे वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी चक्क परळी येथील महावितरण कार्यालयालाच कुलुप ठोकून आंदोलन केले आहे.
मालेवाडीत वीजपुरवठा वारंवार खंडित, ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे - मालेवाडी वीजपुरवठा खंडित
मौजे मालेवाडी गावातील वीज वारंवार खंडित होत असल्याने पोलवरची विद्युत तार काढून केबलद्वारे वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी चक्क परळी येथील महावितरण कार्यालयालाच कुलुप ठोकून आंदोलन केले आहे.
मौजे मालेवाडी गावातील डिपी सतच्या अधिकभारामुळे जळत होता म्हणून येथील सरपंच वैशाली भुराज बदने यांनी स्वखर्चाने डिपी बसवला होता. तरी याभागात तारेवरील आकडे लक्षात घेता सतत डिपी जळत असल्यामुळे पोलवरची विद्युत तार काढून केबल द्वारे वीजपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले असून आज रोजी गावात हरिनाम सप्ताह भरला असुन काही विद्युत कर्मचाऱ्यांनी डिपी काढुन नेल्याने संतप्त गावकऱ्यांनी परळी येथील महावितरण कार्यालयालाच कुलुप ठोकून आंदोलन केले. यावेळी महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले असुन या निवेदनावर भुराज वैजनाथ बदने, आदिनाथ संभाजी बदने, सोमनाथ भुजंग पोटभरे, महादेव वैजनाथ बदने, भागवत बाबुराव बदने, मारुती लक्ष्मण गुट्टे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.