महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन

एकाच दिवशी बीड, कडा व गेवराई येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. मृतांमध्ये सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी आणि शेतकर्‍यांचा समावेश आहे. लखन बनसोडे (वय 25 रा.बाबुलतारा), आकाश शिंदे (वय 22), उद्धव आतकरे (वय 40 रा.निपाणी जवळका), अशोक वाकडे (वय 42) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

बीड जिल्ह्यात चौघांनी गळफास घेत संपवले जीवन

By

Published : Sep 15, 2019, 11:16 PM IST

बीड - एकाच दिवशी बीड, कडा व गेवराई येथे वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. मृतांमध्ये सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी आणि शेतकर्‍यांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

हेही वाचा -पारधी समाजातील 23 वर्षीय युवकाचा खून; कारण अस्पष्ट

आर्थिक अडचण आणि एकतर्फी प्रेमातून लखन बनसोडे (वय 25 रा.बाबुलतारा) या अविवाहित युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. लखनने एका चिठ्ठीत ‘मी आर्थिक अडचण व एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करत असून नातेवाईकांनी कोणास जबाबदार ठरवु नये’ असा मजकूर लिहलेला आहे. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेवराई तालुक्यातच कर्जबाजारीपणाला कंटाळून उद्धव आतकरे (वय 40 रा.निपाणी जवळका) या शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. रविवारी सकाळी राहत्या घराच्या बाजूला एका पोलला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. आतकरे यांच्या पाश्चात पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ, भावजय, मुले, मुलगी असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा -केज पोलिसांनी सोळा वर्षापूर्वीच्या खुनाचा केला पर्दाफाश

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी असलेल्या आकाश शिंदे (वय 22) त्याच्या दोन मित्रांनी मिळून केलेली मारहाण जिव्हारी लागल्याने आपमान झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आकाश शिंदे यांचे वडील दत्तु शिंदे यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राम बोकडे (वय 59), शंकर ओव्हाळ (वय 33) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शंकर याला अटक करण्यात आली आहे. तर, राम बोकडे हा फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करत आहेत.

हेही वाचा -बी़डमध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, अशोक वाकडे (वय 42) यांनी शहरातील शाहूनगर येथील घरात खिडकीला गळफास घेत आत्महत्या केली. अनेक वर्षांपासून अशोक हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. बीड शहरातील एक समाजसेवक आणि धडपडीच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. अशोक यांच्या आतेमहत्येमागील मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

ABOUT THE AUTHOR

...view details