बीड - बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याशिवाय शनिवार व रविवार हे दोन दिवस बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे. या सगळ्या परिस्थितीत बीड शहरातील मार्केटमधील गर्दी मात्र कमी होत नाही. जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये त्यासाठी 144 कलम लागू केला आहे. आता बीड जिल्ह्यातील दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाचशे ते सातशेच्या दरम्यान आहे. एकूण सक्रिय रुग्ण 3 हजाराच्या घरात असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात दिवसाला वाढतायेत चारशे ते पाचशे पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत 29 हजार नागरिकांना कोरोनाची लागण-
बीड जिल्ह्यात बुधवारी एकूण 3529 संशयितांचे नमुने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये 580 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. तर 2449 जण निगेटिव्ह आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर तीन हजार कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
बुधवारी आलेल्या अहवालानुसार खालील प्रमाणे तालुका निहाय रुग्णांची संख्या आहे. यामध्ये अंबाजोगाई 144, आष्टी 71, बीड 176, धारूर 15 , गेवराई 36, केज 50, माजलगाव 39, परळी 60 पाटोदा 18 शिरूर 21 वडवणी 10 असे तालुकानिहाय कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा-अर्ध्यावरती डाव मोडला... संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन, आजच होतं लग्न