महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनचे राजकारण करू नये - धोंडे - Beed District Latest News

कोरोनाला गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दोष न देता, सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करावे. तसेच लॉकडाऊनचे राजकारणासाठी भांडवल न करता प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार भिमसेन धोंडे यांनी केले आहे. आष्टीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

भिमसेन धोंडे
भिमसेन धोंडे

By

Published : Mar 26, 2021, 8:13 PM IST

आष्टी (बीड) -कोरोनाला गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दोष न देता, सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करावे. तसेच लॉकडाऊनचे राजकारणासाठी भांडवल न करता प्रशासनला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार भिमसेन धोंडे यांनी केले आहे. आष्टीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

लॉकडाऊनचे राजकारण करू नये

प्रशासनाला सहकार्य करावे

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 23 हजार 98 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 610 जणांचा मृत्यू झाला आहे. आष्टी, पाटोदा शिरूर तालुक्यात कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊनची घोषणा करावी लागली. मात्र या लॉकडाऊवरून जिल्ह्यात राजकारण सुरू झाले आहे. कोणीही लॉकडाऊचे राजकारण करू नये, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा कोरोनामुळे गंभीर परिस्थिती ओढावू शकते असं यावेळी धोंडे यांनी म्हटलं आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरणाचा वेग देखील वाढायला हवा असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा -महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक; मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तपासणी

ABOUT THE AUTHOR

...view details