महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली तर मजूरांची उपासमार टळेल - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर - starvation of employment in beed during lockdown news

सोशल डिस्टन्स ठेवून व काही नियमावली बनवून रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची तसेच इतर कामे सुरू केली तर मजुरांना काम मिळेल. या शिवाय बीड शहरातील भुयारी गटार योजनेची कामे तसेच पाणी बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांची कामे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.

former minister jaydutt kshirsagar on  starvation of employment in lockdown
रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली तर मजूरांची उपासमार टळेल - माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

By

Published : Apr 15, 2020, 11:15 PM IST

बीड -कोरोनासारख्या अदृश्य संकटाशी आपण मोठ्या हिमतीने लढत आहोत. प्रशासन देखील रात्रंदिवस काम करत आहे. या सगळ्यात बिकट परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम व खायला धान्य कसे मिळेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. सोशल डिस्टन्स ठेवून व काही नियमावली बनवून रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाची तसेच इतर कामे सुरू केली तर मजुरांना काम मिळेल. या शिवाय बीड शहरातील भुयारी गटार योजनेची कामे तसेच पाणी बीड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांची कामे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.

लॉकडाऊनमध्ये मजूरांची परिस्थिती बिकट

एक महिना पुरेल एवढ्या प्रमाणात गहू, तांदूळ यासह इतर वस्तू संस्थात्मक स्तरावर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्या मजुरांच्या हाताला काम नाही. लॉकडाऊनच्या काळात उपासमारी सुरू आहे. गरजूपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करत आहोत. मात्र अशा स्थितीत गावा-गावातील मजुरांना शासन स्तरावरून हाताला काम देण्यासाठी एमआरजीएसच्या माध्यमातून सिंचनाच्या संदर्भातील व वैयक्तिक लाभाची कामे सुरू केली तर मजुरांची उपासमारी रोखता येईल अन्यथा मजुरांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल असेही ते यावेळी म्हणाले.

दुध उत्पादकांना आधार द्यावा लागेल -

या काळात दुध उत्पादकांकडून दुध वितरणाला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी बीड जिल्ह्यातील दुध उत्पादक संकटात सापडला आहे. शासनामार्फत ते दुध संकलित करून त्याची दुध पावडर बनवणे अथवा इतर काही पर्याय करण्याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे देखील क्षीरसागर यांनी सांगितले. बांधकाम मजुरांना देखील शासनाने अशा बिकट परिस्थितीत आधार देण्याची आवश्यकता आहे. योग्य त्या उपाययोजना हे सरकार करेल याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details