महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Power Cut : अस्मानीनंतर शेतकऱ्यांवर सरकारचे सुलतानी संकट - शेतकऱ्यांची वीज खंडित

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ( Farmers have suffered huge losses due to return rains ) झाले आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांची वीज सर्रास तोडली ( Power cut for farmers ) जात आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणी सापडत आहे,

Etv Bharat
Power Cut

By

Published : Nov 16, 2022, 5:27 PM IST

बीड -जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ( Farmers have suffered huge losses due to return rains ) झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेली पीके पावसाने मातीत मिळवली आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

अस्मानीनंतर शेतकऱ्यांवर सरकारचे सुलतानी संकट

सक्तीची वीज बिल वसुली -यातुन शेतकरी सावरतो ना सावरतो तेच पुन्हा एकदा शेतकऱ्यावर सरकाने सुलतानी संकट ओढावल्याचे पाहायला मिळते आहे. कारण शेतकऱ्यांची वीज सर्रास तोडली ( Power cut for farmers ) जात आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणी सापडत आहे, सक्तीची वीज बिल वसुली केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेला मात्र विज वितरण कंपनी कडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आम्हाला बारा तास लाईट द्या -अशी आमची मागणी आहे, लाईट जर नाही दिली तर हे भरणे कसे व्हायचे? ज्वारी पेरली, गहू पेरलायं कुणी, राजमा पेरलायं याला पाणी कसं द्यायचं? तुरीच्या रानाला भेटला पडल्या आहेत. तीला वेळेवर जर पाणी मिळाले नाही तर, हातात आलेले पीक वाया जाईल असे मारुती बसवर या शेतकऱ्यांने ईटव्हीशी बोलतांना सांगितले आहे.


नागनाथ हरिभाऊ घुमरे शेतकरी म्हणाले की, इथून पाठीमागे जसे हाल झाले तसे आमचे आता हाल होऊ देऊ नका. आम्हाला काही झोपा आहेत का नाही, विंचू काट्याची भीती आहे? तुरीला पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही, कापसाचे तर वाटोळ झाला आहे. ज्वारी पेरली गहू पेरलायं. रात्रीचे दारे धरायला अडचण येत आहे. जशा गावात लाईट आहेत तशा शेतामध्ये पोलवर लाईट नाहीत. इचू काट्याचं आम्हाला फिरावा लागत आहे. अंधारामध्ये लाईट व्यवस्थित असल्यावर आम्हाला दारे धरायला काहीच अडचण येत नाही. दिवसा लाईट द्या पण रात्रीच्या नाही सिंगल फेज ठेवा, रात्रीची देऊ नका म्हणजे तुम्ही कंपल्सरी रात्रीची ही बंद ठेवतात असं नाही. रात्रीच्याला सिंगल फेज लाईट पाहिजे, आता डबल पेरण्या केल्या आहेत त्याला पाणी देणे गरजेचे आहे, कुणी उन्हाळी बाजरी केली आहे गहू हरभरा केला आहे त्याला तर आम्हाला कंपल्सरी पाणी द्यावे लागेल. तर, आमच्या पदरात काहीतरी पडल. इथून मागचं सगळं पावसाने घेऊन गेले आहे. आमचं नुकसान झालं आहे, इथून पुढचे तरी आमच्या पदरात पीक येऊ द्या देण्याची विवंती शेतकऱ्यांनी केली आहे.


शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी -नेमकं खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या वाट्याला काही आलं नाही. कापूस सोयाबीन बाजरीसह खरिप पिकांचं अतोनात नुकसान झालं. सरकारनं अतिवृष्टी झाली म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिला आहे, भरपाई तर अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही, आसमानी झाल्यानंतर शेतकऱ्यांवर सरकारचे सुलतानी संकट आले आहे. शेतकऱ्याची वीज तोडण्याचं काम सर्रास महावितरण कंपनी करत आहे. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास लाईट देऊ मात्र, ती घोषणा हवेतच आहे.

महावितरणकडून वीज कनेक्शन तोडले -शेतकऱ्याला एकीकडे विद्युत न देता दुसरीकडे त्यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करण्याचं काम सुरु आहे. सध्या हातात तोंडाशी आलेला घास, पेरलेले पिकांना पाणी देण्याची अत्यंत गरज आहे. अशावेळी सर्रासपणे महावितरणकडून वीज कनेक्शन तोडले जात आहेत. त्यांच्याकडून सक्तीची वसुली केली जात आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आज शेतकऱ्याला गुराढोरांना पाणी शेतीला पिकाला पाणी दिले नाही, तर हि पिकं‌ त्यांच्या हातून जाणार आहेत.

शेतकऱ्यावर अन्याय -शेतकऱ्यांकडून एकीकडे सक्तीची वसुली केली जात असताना मात्र दुसरीकडे महा इंडस्ट्रीज वाल्यांकडं कोट्यावधी रुपयाची थकबाकी असताना शेतकऱ्यांना मात्र वेटीस धरले जातय. निवडणुकीच्या काळात सांगितलं जातं की आम्ही शेतकऱ्याचे नेते आहोत, परंतु जशा निवडणुका संपतात, तसं जाणीवपूर्वक शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम सरकार करत आहे, मी तुमच्या माध्यमातून सांगत आहे की शेतकऱ्यांनी एकजूट दाखवावी व अन्यायाच्या विरोधात उभे राहावे असे अवाहन राजीव काळे या शेतऱ्याने केले आहे.

रामराजे आवारे शेतकरी म्हणाले की, सरकारचंही हे धोरण सध्या चालू आहे ते अत्यंत गंभीर आहे, ज्यावेळेस राजकीय स्टंटबाजी होते त्यावेळेस, बारा तास वीज देऊ, पण ज्यावेळेस शेतकऱ्याला विजेची गरज असते त्यावेळेस तुम्ही दिलेलं आश्वासन कुठे असतं. ही आश्वासन तुम्ही पाळतात का 24 तास जाऊ द्या 12 तास जाऊ द्या त्यांना फक्त 8 तास वीज द्या ती ही लाईट दिवसा द्यावी.

दिवसा आठ तास तरी लाईट द्यावी -रात्रीच्या ला विंचू साप हे असतात किंवा व्याघ्रप्राणी असतात याच्यापासून जर त्यांचा संरक्षण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने शासनाने आपला शब्द पाळला पाहिजे. दिवसा आठ तास तरी लाईट द्यावी, आपलं कर्तव्य आहे ते आपल्यासाठी जगतात... आपण त्यांना जगाचा पोशिंदा म्हणतो खऱ्या अर्थाने सर्व नोकरदारांना किंवा सर्वांनाच अन्नपुरवठा करणारा हा शेतकरी असतो. अडचणीच्या काळात जर त्याला आपण असं धारेवर धरलं तर, आजही पीक पाण्याला आलेली आहेत.

शेताला पाणी द्यायचं कसं?पाण्याअभावी जर पिके वाळून गेली तर, आजही तुरीचे पीक आहे जर ,याला वेळेवर पाणी मिळालं नाही तर ही फुलं गळून जातील मग त्याचा उपयोग काय होणार. मग उत्पन्न कसं येणार पाणी असून पाणी देता येत नाही, त्याचं कारण आहे वीज आणि वीज जर उपलब्ध नसेल तर शेताला पाणी द्यायचं कसं? आमची मागणी आहे की शेतकऱ्यांना फक्त आठ तास, तीही दिवसा लाईट द्यावी.

ABOUT THE AUTHOR

...view details