बीड- पैठणच्या जायकवाडी नदीतून पाण्याच्या विसर्ग केली जात आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील गोदाकाठी असलेल्या श्रीक्षेत्र राक्षस भवन येथील शनी मंदिर व पांचाळेश्वर मंदिराभोवती पाण्याचा वेढा पडला आहे. साधारणता बीड जिल्ह्यातील 32 गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गोदावरीला पूर; बीडमधील 32 गावांना सतर्कतेचा इशारा - जायकवाडी नदी
नाथसागर जलाशयाच्या पाणी साठ्यात 100 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणामधून बुधवारी नाथसागराचे 16 दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग गोदवारी नदी पात्रात सोडण्यात आला.
हेही वाचा-पुण्यात पुराच्या पाण्यात एकाच गोशाळेतील 35 गायींचा मृत्यू
नाथसागर जलाशयाच्या पाणी साठ्यात 100 टक्के इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणामधून बुधवारी नाथसागराचे 16 दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग गोदवारी नदी पात्रात सोडण्यात आला. तसेच डाव्या आणि उजव्या कालव्यातूनही विसर्ग सुरुच आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने, जनावरे पात्रात सोडू नयेत, कोणतीही जीवित, वित्त हाणी होणार नाही याची सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी. विशेषकरुन विद्यार्थी व तरुणींनी नदीपात्रात सेल्फीसाठी जावू नये, असे जाहीर आवाहन महसूल प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.