महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये आयोजन - वृक्ष संमेलन आयोजक सयाजी शिंदे

अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकारातून वृक्षप्रेमींच्या एका गटाने वृक्ष संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनासारखेच या वृक्षसंमेलनाचे स्वरूप असणार आहे. येत्या 13 आणि 14 फेब्रुवारीला हे वृक्ष संमेलन होणार आहे.

वृक्ष संमेलन
वृक्ष संमेलन

By

Published : Jan 21, 2020, 6:10 PM IST

बीड -राज्यात पहिल्यांदाच वृक्ष संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. बीड जिल्ह्यात येत्या 13 आणि 14 फेब्रुवारीला वृक्ष संमेलन होणार आहे. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वृक्ष संमेलन भरवून वृक्षांबाबत प्रेम निर्माण व्हावे, झाडांचे संवर्धन व्हावे, निसर्गाची जपणूक व्हावी यासाठी आगळे-वेगळे संमेलन भरवण्यात येणार आहे.

पहिल्या वृक्ष संमेलनाचे बीडमध्ये आयोजन


अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या पुढाकारातून वृक्षप्रेमींच्या एका गटाने या संमेलनाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनासारखेच या वृक्षसंमेलनाचे स्वरूप असणार आहे. सर्वाधिक वडाची झाडं असलेला जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. त्यामुळे वडाचे झाड या संमेलनाचा लोगो (प्रतीक) असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यातील विविध भागांतील वृक्ष अभ्यासक वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजक आणि लेखक अरविंद जगताप यांनी दिली.

हेही वाचा - दुधाच्या भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव, अमूलने केला 'हा' आरोप

राज्यातील वृक्ष प्रेमींना एकत्र आणण्यासाठी आणि लोकांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी. यासाठी या वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातून पाच झाडांची लागवड केली जाणार आहे. कार्यक्रमादरम्यान झाडांशी संबधित गाणी, अभंग, गायली जाणार आहेत, अशी माहिती अभिनेते आणि आयोजक सयाजी शिंदे यांनी दिली.

साहित्य संमेलनात पुस्तकांची दुकाने असतात त्याप्रमाणे या संमेलनात रोपांची दुकाने असणार आहेत. तेथे विविध प्रकारच्या वृक्षांची बियाणे आणि रोपे पहायला मिळतील. विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व कळावे म्हणून 20 तज्ञ संमेलनात येणार आहेत. ते विद्यार्थ्यांना झाडांशी संबंधित करियरविषयी माहिती सांगतील. जिथे पाणी कमी आहे, अशा ठिकाणी वृक्ष संमेलन भरवण्याचा विचार आयोजकांचा आहे. त्यामुळे यावर्षी बीडमध्ये संमेलन भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details