बीडमधील राष्ट्रीय चित्र प्रदर्शनबाबत माहिती देताना
बीड: जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील चित्रकारांना वाव मिळावा व त्यांचे चित्र प्रदर्शित व्हावे याच्यासाठी हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. विशेष करून या चित्र प्रदर्शनामध्ये शाळेतील लहान मुले, अबालवृद्ध हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने आलेले आहेत. कारण हे चित्रप्रदर्शन हे बीड शहरांमध्ये पहिल्याच वेळेस भरत असल्याने एक आगळावेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
काय म्हणतात चित्रकार: चित्रकार अंजली खोबरे म्हणाल्या की, बीड शहरांमध्ये हे राष्ट्रीय चित्र प्रदर्शन होत आहे. त्यामुळे आम्हाला काढलेले चित्र दाखवण्याचा व ते चित्र लोकांसमोर मांडण्यासाठी आम्हाला बाहेरगावी जावा लागत नाही त्यामुळे बीड शहरातच आम्हाला स्टेज उपलब्ध झाल्यामुळे त्याचा वेगळा आनंद आम्हाला मिळत आहे. या चित्रपटदर्शनासाठी केएसके महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा क्षीरसागर यांनी आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे की बीड शहरात जसे स्टेज मिळाले आहे तसेच बाहेर राज्यांमध्येही इतर ठिकाणी पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी आम्हाला व्यासपीठ मिळावे, अशी आमची मागणी आहे. प्रत्येक वर्षी असेच चित्र प्रदर्शन बीड जिल्ह्यात व्हावे त्यामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.
आंतराराष्ट्रीय दर्जाचे चित्र : तरूणी धनश्री चित्रकार म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील कलावंतांसाठी आज एवढा मोठा मंच उपलब्ध झालेला आहे. बीड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चित्रकला प्रदर्शन भरलेले आहे, या ठिकाणी लागलेले चित्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. आमची कला आमचे चित्र आम्ही आज या चित्र प्रदर्शनात दाखवू शकत आहोत, मातीत घडलो आहोत त्या मातीतील लोकांना हे चित्र आम्ही दाखवण्यासाठी आम्हाला वेगळा आनंद होत आहे. ठिकाणी येऊन लोक आमचे कला पाहात आहेत व आम्हाला प्रोत्साहन देत आहेत.
चित्रपदर्शनामध्ये सहभागी चित्रकार: आयोजक सारिका क्षिरसागर म्हणाल्या की, राष्ट्रीय चित्र प्रदर्शन आहे. या ठिकाणी उत्कृष्ट चित्र आपल्याला पाहायला मिळतील. विशेष करून बीड जिल्ह्यातीलच कलाकार या चित्रप्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. जिल्ह्यातील सर्व चित्रकारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि विशेष करून ग्रामीण भागातील तरुण तरुणी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या चित्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत. बीड जिल्ह्यातील चित्र कलाकार हे विखुरलेले होते ते एकत्र आणण्याचं काम आम्ही केलं आहे बीड जिल्ह्यातील सर्वोच्च शाळातील मुलांना आम्ही चित्र प्रदर्शन दाखवण्यासाठी बोलव त आहोत आणि जेणेकरून जे चित्रकलाकार आहेत त्यांच्यातल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही हे व्यासपीठ त्यांच्यासाठी मिळवून दिलेले आहे.
हेही वाचा:Shiv Jayanti 2023 : इतिहासात पहिल्यांदा! आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित