बीडच्या एलआयसी इमारतीला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक - एलआयसी कार्यालय बीड
बीड शहरातील नगर रोड भागात एलआयसीचे दोन मजली मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाला लागलेल्या आगीत कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
![बीडच्या एलआयसी इमारतीला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळून खाक fire broke out in lic office beed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9482254-658-9482254-1604890726246.jpg)
बीड- शहरातील नगर रोडवरील एलआयसी विभागाच्या कार्यालयाला सोमवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीत कार्यालयातील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने जीवित हानी झालेली नसल्याचे एलआयसी शाखाधिकारी परदेशी यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड शहरातील नगर रोड भागात एलआयसीचे दोन मजली मुख्य कार्यालय आहे. या कार्यालयाला लागलेल्या आगीत कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहेत. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख रामप्रसाद राऊत यांनी सांगितले.