महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळीतील मेरुगिरीच्या पायथ्याला लागली आग; अनर्थ टळला - परळी वैद्यनाथ मेरुगिरी

मेरूगिरी पर्वताच्या झाडाझुडुपांमध्ये भर दुपारी कडाक्याच्या उन्हात ही आग लागली होती. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

परळीतील मेरुगिरीच्या पायथ्याला लागली आग
परळीतील मेरुगिरीच्या पायथ्याला लागली आग

By

Published : Apr 25, 2021, 7:32 AM IST

परळी वैजनाथ (बीड) - शहरातील मेरुगिरी पर्वताच्या पायथ्याला आग लागल्याची घटना शनिवारी( दि.24) दुपारच्या सुमारास घडली. मेरूगिरी पर्वताच्या झाडाझुडुपांमध्ये भर दुपारी कडाक्याच्या उन्हात ही आग लागली होती. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

परळी वैजनाथ हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराला इतिहासाचा मोठा वारसा लाभला आहे. परळीचे एक वैशिष्ट्य म्हणून ओळख असलेल्या मेरूपर्वतावर अनेक झाडे झुडपे आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे, अशा कडाक्यातच मेरू गिरी पर्वताच्या पायथ्याला अचानक आग लागली. येथील कब्रस्तानच्या कपांऊड जवळील झाडा झुडपा मध्येही आग लागली होती.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी

अचानक धुराचे लोट आकाशात पसरताना नागरिकांना दिसले. त्यामुळे सतर्क झालेल्या नागरिकांनी तत्काळ परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला फोन करून याची माहिती दिली. यावर अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीसह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.

उन्हाळा असल्याने वाळलेल्या झुडपामध्ये आग वेगाने पसरत चालली होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग वेळीच आटोक्यात आणली. सध्या चैत्र महिन्यात झाडांची पाने गळती झाली आहे. गवत वाळलेले आहे. त्यामुळे आग पसरण्याचा धोका होता. मात्र शहरातील नागरिकांच्या सर्तकतेमुळे व अग्नीशामन दलाच्या जवानांच्या कामगिरीने आग आटोक्यात येऊन पुढील धोका टळला.

ABOUT THE AUTHOR

...view details