महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अग्निशमन दलाकडून बेपत्ता तरुणाचा बिंदुसरा धरणामध्ये शोध सुरू - search operation in bindusara dam

बीडमधील धानोरा रोड भागात राहणारा एक तरुण शनिवारी बेपत्ता झाला होता. आज त्याची दुचाकी बिंदुसरा धरणाजवळ आढळून आल्याने तो धरणात बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.

search operation in bindusara dama
बिंदुसरा धरणात युवकाचा शोध सुरू

By

Published : Sep 6, 2020, 8:38 PM IST

बीड- शनिवारी बेपत्ता झालेल्या एका तरुणाची दुचाकी शहराजवळील बिंदुसरा धरणाजवळ आढळली. हरीश पोपटराव उबाळे (२०, रा. संत नामदेवनगर पूर्व, धानोरा रोड, बीड) असे त्या तरुणाचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बिंदुसरा धरणामध्ये युवकाचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा-विलगीकरणात आलेल्या नैराश्यातून महिलेची आत्महत्या; अंबाजोगाई तालुक्यातील घटना

हरीश उबाळे बी.टेकचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील राज्य राखीव पोलीस दलातून निवृत्त झालेले आहेत तर आई जिल्हा रुग्णालयात परिचारिका आहे. हरीश याच्यावर दोन वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी तो कोणाला काही न सांगता दुचाकीवरुन घराबाहेर पडला, रात्रीपर्यंत घरी परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही.

रविवारी सकाळी बिंदुसरा धरणाच्या मुख्य सांडव्याजवळ त्याची दुचाकी व चप्पल आढळून आली. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे यांनी घटनास्थळी भेट दिली. हरीश उबाळे हा धरणात बुडाल्याच्या संशय आहे. यामुळे त्याला शोधण्यासाठी अग्निशामक दलाचे जवानांना पाचारण करण्यात आले. उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details