बीड - ऊसतोड मजुरांचा संप सुरू असताना देखील बीड जिल्ह्यातून ऊसतोड मजुरांना जिल्ह्याबाहेर घेऊन जाणाऱ्या गाड्या बुधवारी आमदार सुरेश धस यांनी रोखून धरल्या. यावरून आष्टी पोलीस ठाण्यात भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करुन अर्ध्या तासानंतर लगेच सोडण्यात आले. प्रतिबंधात्मक कारवाई करून आमदार धस यांची सुटका केली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ऊसतोड मजुरांना रोखले, अटकेनंतर आमदार सुरेश धसांची अर्ध्या तासातच सुटका - beed shugarcane worker latest news
आमदार सुरेश धस म्हणाले, की जो पर्यंत ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्यात ऊस तोडणी दर वाढीबाबत शासन निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यातून जाऊ देणार नाही.
![ऊसतोड मजुरांना रोखले, अटकेनंतर आमदार सुरेश धसांची अर्ध्या तासातच सुटका fir on mla suresh dhus for stopped sugarcane workers in beed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8822486-477-8822486-1600252494535.jpg)
महाराष्ट्रात ऊसतोड मजूरांचा संप सुरू असताना मालेगाव, नाशिक येथून काही ऊसतोड मजूरांना घेऊन जाणारे तीन ट्रक मिरजगाव (जि.अहमदनगर) हद्दीतून म्हाडा तालुका, कर्जत तालुक्यातील अंबालिका या कारखान्यांवर हे मजूर चालले होते. धस समर्थकांनी त्यांना आष्टी येथे थांबवून घेतले. या वाहनांमधून जवळपास 400 ते 450 मजूर आपल्या लहान मुलांसहीत कुठलीही काळजी न घेता जात असल्याचे विदारक चित्र होते. या मजूरांची कसल्याही प्रकारची कोरोनाची टेस्ट करण्यात आलेली नाही. सध्या कुठलाच कारखाना सुरू नसतानाही ही मजूर वाहतुकीची घाई कशासाठी? असा सवाल उपस्थित केला.
आमदार सुरेश धस म्हणाले, की जो पर्यंत ऊसतोड मजूर आणि मुकादम यांच्यात ऊस तोडणी दर वाढीबाबत शासन निर्णय घेत नाहीत. तोपर्यंत ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यातून जाऊ देणार नाहीत. तसेच सध्या आमचा संप शांततेत सुरू असून अशा पद्धतीने कारखानदार वाहतूक करणार असतील तर आम्हाला आमचा संप अधिक आक्रमक करावा लागेल असा इशारा देखील दिला.