बीड -अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग, फराह खान यांच्याविरोधात बीडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिश्चन समाजाचा पवित्र ग्रंथ बायबलमधील 'हलेलुया' या शब्दाचा विपर्यास केल्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्फा ओमेगा ख्रिश्चन संघटनेचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी शनिवारी तक्रार दाखल केली आहे.
'बॅक बेंचर्स' हा कॉमेडी शो फ्लिपकार्डच्या अॅपवर चालतो. २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी रविना टंडन, फराह खान, भारती सिंग व हुजेफर क्यूजर यांनी ख्रिश्चन समाजाच्या बायबलमधील 'हलेलुया' या पवित्र शब्दाचा विपर्यास करत जाहीरपणे चुकीचा अर्थ सांगितला.
हेही वाचा -रवीना, फराह खान आणि भारतीविरोधात चंदिगढमध्ये आणखी एक तक्रार दाखल