महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाण वडिलांची मागणी - शांताबाई राठोड आरोप

माझी मुलगी पूजा हिच्या मृत्युनंतर तिची नाहक बदनामी करण्याचे काम गेल्या काही दिवसात सुरू आहे. या प्रकरणामध्ये शांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा आमच्या मुलीशी कसलाही संबंध नसताना वेगवेगळे आरोप करण्यास सुरूवात केली आहे.

file-fir-on-shantabai-rathod-demand-by-puja-chavhans-father-beed
शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा

By

Published : Mar 2, 2021, 5:49 PM IST

Updated : Mar 2, 2021, 10:47 PM IST

परळी (बीड) -पूजा चव्हाण या तरूणीच्या वडिल लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शांताबाई राठोड या महिलेने पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांनी पाच कोटी रूपये घेतल्याचा आरोप केला आहे. यानंतर लहू चव्हाण यांनी परळी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पूजा चव्हाण हिच्या वडिलांची प्रतिक्रिया.

तक्रारी अर्जात काय?

या संदर्भात दिलेल्या तक्रारी अर्जात लहू चव्हाण यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी पूजा हिच्या मृत्युनंतर तिची नाहक बदनामी करण्याचे काम गेल्या काही दिवसात सुरू आहे. या प्रकरणामध्ये शांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा आमच्या मुलीशी कसलाही संबंध नसताना वेगवेगळे आरोप करण्यास सुरूवात केली आहे. संजय राठोड यांनी पूजा चव्हाणच्या आई-वडिलांना पाच कोटी रूपये दिल्याचा आरोप केला आणि त्यामुळेच ते पूजाला न्याय मागण्यासाठी तोंड उघडत नसल्याने प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. एवढेच काय तर संजय राठोड यांनी दिलेले पाच कोटी रूपये घरात जमिनीत पुरून ठेवले असून त्या पैशासाठी जावयांमध्ये भांडणे सुरू असल्याचेही म्हटले आहे.

पोलीस अधिकारी यांना तक्रार अर्ज देताना पूजा चव्हाण हिचे वडील.

हेही वाचा -पूजा चव्हाण प्रकरण: फडणवीसांसह भाजपच्या या नेत्यांविरुद्ध दाखल तक्रार मागे

अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे माझी व माझ्या कुटुंबीयांची व जावयाची बदनामी करणारे आहे. या प्रकरणामध्ये आमची फिर्याद घेऊन शांताबाईच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पूजाचे वडील लहू चंदू चव्हाण यांनी केली. याबाबत तक्रार अर्ज त्यांनी परळी शहर पोलिसांकडे दिला. आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पूजा चव्हाण या तरूणीच्या मृत्युनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. वनमंत्र्यांना याच प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.

Last Updated : Mar 2, 2021, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details