महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 2, 2019, 10:42 PM IST

ETV Bharat / state

बेकायदेशीर विवाह प्रकरणात महिला पोलीस अधिकार्‍याला शिक्षा

पहिला विवाह झालेला असतानाही दुसरा विवाह केल्याप्रकरणी एका महिला पोलीस अधिकार्‍याला 6 महिने शिक्षा सुनावण्यात आली. मिनल नाईक (रा. थिगळे गल्ली, बीड) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मिनल पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

बीड -पहिला पती असताना दुसरा विवाह केल्याप्रकरणी एका महिला पोलीस अधिकार्‍याला 6 महिने शिक्षा सुनावण्यात आली. बीडच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्यासह तिचा भाऊ आणि आई-वडिलांनाही शिक्षा सुनावली.


मिनल नाईक (रा. थिगळे गल्ली, बीड) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मिनल पुणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तीने पहिले लग्न झालेले असताना बेकायदेशीररित्या दुसरा विवाह केला. सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर मिनल नाईक पुणे शहरातील वारजे पोलीस ठाण्यात रुजू झाली. मात्र, त्यानंतर ती दुसऱ्या पतीच्या घरी परत आलीच नाही. त्यामुळे फिर्यादीने (दुसऱ्या पतीने) चौकशी केली. दोन वर्षापूर्वीच मिनलचा पुणे येथील विवाह नोंदणी कार्यालयात विवाह झालेला असल्याचे फिर्यादीला समजले. त्यानंतर फिर्यादीने मिनलसह तिचे वडील गोविंदराव वसंतराव नाईक, आई माधवी गोविंदराव नाईक व भाऊ मनिष गोविंदराव नाईक यांच्या विरोधात बीड न्यायालयात खटला दाखल केला.

हेही वाचा - सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक चर्चा घडवा, राज यांची पवारांना विनंती

या प्रकरणामध्ये फिर्यादीच्यावतीने अविनाश कुलकर्णी आणि त्यांचा भाऊ अमोल कुलकर्णी यांच्या साक्षी, पहिल्या लग्नाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दुसऱ्या लग्नाचे फोटो पुरावे म्हणून सादर करण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी धरले.

ABOUT THE AUTHOR

...view details