महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निर्दयी प्रशासनाचा बळी! पारधी समाजातील उपोषणकर्त्या वृद्धाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत्यू - Fasting For Installments Of Gharkul Yojana

बीडमध्ये हक्काच्या घरकुलाचे उरलेले हप्ते मिळण्यासाठी उपोषणाला बसलेल्या वृद्ध्याचा मृत्यू ( Fasting Old Man From Pardhi Community Died ) झाला. त्यांच्या मृत्यूला स्वतः जिल्हाधिकारी जबाबदार की प्रशासन ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Fasting Old Man Died
उपोषणकर्त्या वृद्धाचा मृत्यू

By

Published : Dec 4, 2022, 4:02 PM IST

बीड :शासनाच्या लाल फितशाहीचा कारभार आणि प्रशासन किती गेंड्याच्या कातडीच असते याचा नमुना बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच थंडीने कुडकुडत या उपोषणार्थी वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला ( Fasting Old Man From Pardhi Community Died ) आहे.

उपोषणकर्त्या वृद्धाचा मृत्यू

वासनावाडी येथील रहिवासी :आप्पाराव भुजाराव पवार हे वासनावाडी येथील रहिवासी आहेत. ते कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. शासनाने मंजूर केलेले घरकुल तातडीने बांधून देण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी पवार हे कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण करत ( Old Man Died In Front Of Collector Office ) होते. मात्र या उपोषनकर्त्या व्यक्तीची साधी दखलही घ्यायला जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांच्यासह प्रशासनाला वेळ मिळाला नाही. दरम्यान पवार यांचा सकाळी मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे

जिल्हा प्रशासन जबाबदार : दरम्यान याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. वारंवार निवेदने आणि अर्ज देऊन देखील त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली आणि अखेर थंडीने कुडकुडल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी ( Fasting For Installments Of Gharkul Yojana ) केला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details