बीड -बी-बियाणे खरेदीसाठी गेवराई शहरात आलेल्या एका शेतकऱ्याला लॉकडाऊनचे कारण काढुन गेवराई पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे. ही घटना सोमवारी 31 मे रोजी सकाळी कोल्हेर रोडवर घडली आहे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितले आहे.
बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला पोलिसांची बेदम मारहाण, मुख्यमंत्र्याकडे करणार तक्रार – लक्ष्मण पवार - आमदार लक्ष्मण पवार यांच्याबद्दल बातमी
बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आमदार लक्ष्मण पवार यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीसांची मुख्यमंत्र्याकडे करणार तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
![बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांला पोलिसांची बेदम मारहाण, मुख्यमंत्र्याकडे करणार तक्रार – लक्ष्मण पवार Farmers who came to buy seeds have been beaten by the police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11966276-977-11966276-1622461590087.jpg)
कोविड महामारीचा सामना करत असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांची खरीप पेरणीची तयारी सुरू आसल्याने शेतकऱ्यांना खते व बि बियाणे खरेदीसाठी सूट देण्यात आली आहे. यामुळे शेतकरी खरेदीसाठी शहरात येत आसून या शेतकऱ्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात येत आहे, असा आरोप लक्ष्मण पवार यांनी केला आहे. 31 मे रोजी तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी मोतीराम अच्युत चाळक (वय ४०) हे बी बियाणे खरेदीसाठी गेवराई शहरात आले होते.
पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर बी बियाणे खरेदीसाठी आलो असे सांगितल्यानंतर ही पोलिसांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून त्यांना जबर मारहाण झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे पवार म्हणाले. एकीकडे रात्रंदिवस अवैध वाळू वाहतूक सुरू असताना याकडे साफ दुर्लक्ष करत अवैध धंद्यावाल्यांना अभय देऊन गोरगरीब शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीसांची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार लक्ष्मण पवार यांनी सांगितले.