बीड -सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे जमिनीची नापिकी, कर्जाचा डोंगर यातून आलेल्या नैराश्येमुळे बीड जिल्ह्यातील तेलगावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संदिपान रामनाथ इके (वय.६५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे घेतलेले कर्ज फिटत नसल्याने संदिपान हे चिंताक्रांत होते. यातच घर संसार चालवायचा कसा याचा मोठा प्रश्न संदिपान यांच्यासमोर उभा राहिला होता. या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी अखेर रविवारी धुमाळ यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संदिपान यांच्याकडे ग्रामीण बँकेचे कर्ज होते. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे घेतलेले कर्ज फिटत नसल्याने संदिपान हे चिंताक्रांत होते. यातच घर संसार चालवायचा कसा याचा मोठा प्रश्न संदिपान यांच्यासमोर उभा राहिला होता. या सगळ्या परिस्थितीतून त्यांनी अखेर रविवारी धुमाळ यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. दुष्काळामुळे बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहावर धारूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून तेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.