बीड- दुष्काळामुळे नापिकी व त्यातून उद्भवलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 50 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंजनवती येथे गुरुवारी घडली. बबन श्रीपती शिंदे (रा. अंजनवती ता. जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आत्महत्येचे सत्र सुरुच, कर्जाला कंटाळून बीडमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
दुष्काळामुळे नापिकी व त्यातून उद्भवलेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 50 वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
बबन श्रीपती शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 10 लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज फेडायचे कसे? असा बबन शिंदे यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला होता. त्याबरोबरच दुष्काळामुळे दिवसेंदिवस शेतीतून जास्त उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे नैराश्यातून बबन शिंदे यांनी गुरुवारी रोळगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
बबन शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व 4 विवाहित मुली, असा परिवार आहे. बबन शिंदे यांच्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.