महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fake Currency : शंभर, दोनशेच्या बनावट नोटांचा सुळसुळाट - fake currency of Rs 100 and Rs 200 notes

माजलगाव शहरात शंभर, दोनशेच्या बनावट नोटा चलनात (fake currency of Rs 100 and Rs 200 notes Scattering) वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या विरोधात कारवाई (Action against circulate fake notes) करावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.

fake currency
बनावटी नोटा

By

Published : Nov 6, 2022, 5:19 PM IST

बीड : माजलगाव शहरात शंभर, दोनशेच्या बनावट नोटा चलनात (fake currency of Rs 100 and Rs 200 notes Scattering) वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या विरोधात कारवाई (Action against circulate fake notes) करावी, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. त्यामुळे खरेदी विक्री करताना व्यापाऱ्यांकडून प्रत्येक नोट पाहूनच घेतली जात असल्याने व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. Latest news from Beed, Beed Crime

बनावटी नोटा व्हिडीओ

ग्राहकाला आला संशय -सिध्देश्वर गायकवाड यांना दोनशे रुपयांच्या नोटवर शंका आली. यासाठी त्यांनी त्या नोटांचे BAT 964022 निरीक्षण केले असता, त्यावर उजव्या बाजूला महात्मा गांधी यांचे पांढरे वॉटरमार्क नव्हते. नोटवर सेफ्टी लाइन ही जाड नसून फक्त हिरव्या रंगाची प्रिंटिंग होती.

बनावटी नोटांविरुद्ध कारवाई केव्हा?
सोबतच दुसऱ्या दोनशेच्या नोटा व त्या नोटाच्या रंगातसुद्धा थोडा फरक दिसून आला. मागील तीन चार दिवसांपासून बाजारात खरेदी करत असल्याने ती नोट कुणी दिली असेल याची खात्री सिध्देश्वर यांना करता आली नाही. बँक आणि पोलीस प्रशासनांना कारवाई करणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details