महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आष्टीत इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा स्थापन; डॉक्टरांनी संघटित होणे काळाची गरज - डॉ. लोंढे - इंडियन मेडिकल असोसिएशन न्यूज

आष्टी येथे इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेचे उद्घाटन 18 फेब्रुवारीला संपन्न झाले.

ashti
आष्टीत इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा स्थापन

By

Published : Feb 20, 2021, 4:59 PM IST

Updated : Feb 20, 2021, 6:20 PM IST

आष्टी(बीड) -गेल्या महिन्यात भंडारा जिल्ह्यात बाल शिशूगृहात आग लागली होती. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे सोडून शासनाने डॉक्टरांना दोषी धरून, येथील डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. परंतु, याठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनने आवाज उठवल्याने डॉक्टरांवरील कारवाई रोखली, हे ऐकीचे बळ असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले आहे. आष्टी येथे इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेचे उद्घाटन 18 फेब्रुवारीला संपन्न झाले. यावेळी डॉ.लोंढे बोलत होते.

आष्टीत इंडियन मेडिकल असोसिएशनची शाखा स्थापन

याप्रसंगी राज्याचे उपाध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे, महाराष्ट्र राज्याचे सहसचिव शिवाजीराव काकडे, आष्टीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह चौरे, उपाध्यक्ष डॉ. रामदास सानप, सचिव सुनिल बोडखे, कोषाध्यक्ष डॉ.सुजय सोनवणे हे मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. रामकृष्ण लोंढे म्हणाले की, मी 1993 साली महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनचा सदस्य झालो. त्यानंतर मी सुरूवातीला 12 सदस्य केले. आज याच कामाचे चीज झाले आणि तब्बल 39 वर्षांनी मराठवाड्याला राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली. मी हे मुद्दामून सांगतो की, एका शाखेचा सदस्य महाराष्ट्र राज्यात काम करू शकतो. आपण केलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. आपण सर्व वैद्यकीय क्षेञात काम करत असताना, आपण आपलाच विचार करत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात सातवी शाखा आहे. तर संपूर्ण भारतात साडेतीन लाख सदस्य आहेत. तरी यात सध्या आष्टीच्या संघटनेने सभासद वाढवणे गरजेचे असल्याचे लोंढे म्हणाले.

गेल्या महिन्यात भंडारा जिल्ह्यात बाल शिशूगृहात आग लागली. त्याचा शासनाने आपल्याला त्रास देण्याचा सपाटा लावला आणि प्रत्येक रुग्णालयाचे फायर ऑडीटची नियमावली टाकली. यात आता आपला काही दोष आहे का? तसेच या राज्य शासनाने भंडाराच्या त्या प्रकरणात डॉक्टरांना दोषी धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले .परंतु, आम्ही तिथे गेलो आणि त्यावर आवाज उठवला असता राज्य शासनाने माघार घेतली, अशी संघटनेची ताकद असल्याचेही डॉ. लोंढे यांनी सांगितले.

राज्याचे उपाध्यक्ष रविंद्र कुटे म्हणाले, महाराष्ट्रात ही आजची 218 वी शाखा स्थापन झाली. महाराष्ट्रात 45 हजार पेक्षा जास्त सभासद असल्याचेही डॉ. कुटे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे सहसचिव शिवाजीराव काकडे म्हणाले, भारतात सर्वात जुनी ही शाखा असून, देशात आतापर्यंत 32 राज्यात साडेसतरा हजार शाखा असून ही सर्वात जुने संघटना आहे. या संघटनेचे दोन उद्दीष्ट्ये आहेत. यातील सर्व वैद्यकीय क्षेञात काम करणाऱयांना बऱयाच अडचणी येतात त्यांना आपण संघनेच्या माध्यमातून आधार देत असल्याचेही त्यांनी सांगितले. मी या संघटनेचा सदस्य का होऊ? असा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहिला असेल. कारण या संघटनेत काम करणाऱ्या सदस्यांना आपण सर्वांनी एकञ येऊन मदत करून त्यांच्या कुटूंबीयांना आधार देण्याचे काम करत असतो. आपल्या संघटनेतील सदस्यांचा दुर्देवाने मत्यू झाला तर त्यांच्या कुटूंबीयांना प्रत्येक सदस्यांकडून दोनशे रूपये प्रमाणे याची साधारणपणे नऊ लाख रूपयांची मदत आम्ही आपल्या सदस्यांच्या घरी पोहच करतो. तसेच आपल्या डॉक्टर पेशात जर काहींवर हल्ला झाला किंवा अन्याय झाला तर त्यांना जिल्हा ते सुप्रीम कोर्टापर्यंत वकील आपल्यामार्फत देण्यात येतो. त्यामुळे ही संघटना म्हणजे डॉक्टरांनी डॉक्टरांसाठी बनवली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित तालुका कार्यकारणीचा मान्यवरांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात डॉ.अशोक गांधी, डॉ.मधुकर हंबर्डे, डॉ.कल्याणरावजी वारे, डॉ. डी,एस.काकडे, डॉ.विलास सोनवणे यांचा जीवन गौरव म्हणून सन्मान करण्यात आला.

Last Updated : Feb 20, 2021, 6:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details