बीड - येथील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने आलेल्या नैराश्येतून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.
गणेश तुकाराम कराड (वय २४, रा. वांगदरी, ता. परळी) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे सर्व कुटुंबीय अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गणेश सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला. ही बाब गणेशच्या मनाला लागल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता.