बीड - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अतिक्रमण बीड नगरपालिकेने मंगळवारी हटवले. मागील अनेक महिन्यांपासून मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. परिणामी पादचाऱ्यांना रस्त्याने चालताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. अखेर नगरपालिकेने मुख्य रस्त्यावरची छोटी-छोटी दुकाने व हातगाडे हटवल्या मुळे शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा -फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण
मुख्य मार्गावर मागील अनेक महिन्यापासून वाढते अतिक्रमण हटविण्याच्या संदर्भाने नागरिकांमधून मागणी होत होती. अखेर मंगळवारी बीड नगरपालिकेने बीड शहरातील अतिक्रमण हटविण्या संदर्भात पुढाकार घेतला व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी रोड तसेच बीड नगरपालिका परिसरातील अतिक्रमण हटवले आहे. पालिकेने केलेला या कारवाई संदर्भात बीडकरांनी समाधान व्यक्त केले असून शहरातील इतर मार्गावरील अतिक्रमण देखील तात्काळ हटवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.