परळी वैजनाथ (बीड)- परळी तालुक्यात महावितरण कंपनीने कृषी पंपाचे विज तोडणीची मोहीम हाती घेतल्याने तालुक्यातील अनेक गावे अंधारात गेली होती. गावचा पाणी प्रश्न निर्माण झाला होता. पण, भाजप नेते फुलचंद कराड यांनी परळीचे महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. तालुक्यातील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चर्चा करत यावर तोडगा काढला.
शेतकऱ्यांना बिलाबाबत सहकार्य करा आणि तत्काळ बंद असलेली वीज सुरू करा अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन उभे होईल व हजारो शेतकरी विजवीतरण कार्यालयासमोर येतील, असा इशारा फुलचंद कराड यांनी दिला होता. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून याबाबत तोडगा काढला व बिलात सवलत देऊन तत्काळ पैसे भरून घेतले व विजजोडणी केली. फुलचंद कराड यांच्या आंदोलनाला यश आले असून, यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व दुष्काकाळाच्या झळा सोसत असणाऱ्या शेतकऱ्यांना अवाजवी बिले दिली गेली आहेत. एकीकडे अवाजवी बिल देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. बिलाची थकबाकीचे कारण गावच्या डिपीचे कनेक्शन तोडली गेली आहेत. यामुळे गावगावचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेताच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. त्यानंतर महावितरण कार्यालयातील अधिकारी प्रशांत अंबडकर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन मार्ग काढला आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडून 5 हजारांऐवेजी 3 हजार रुपये प्रति कृषीपंप बील भरणा करुन देतो. तुम्ही त्वरित लाईट चालू करुन द्या, असे महावितरण अधिकाऱ्यांना फूलचंद कराड यांनी सांगितले. तो निर्णय अधिकाऱ्यांना पटला आणि अतिषय सामंजस्याने प्रश्नमार्गी लावला आहे. या निर्णयामुळे संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -राखेची साठवणूक व वाहतूक ७२ तासात नियंत्रणात आणा; उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांचे आदेश
हेही वाचा -परळी : भाजपाकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी