बीड- जिल्ह्यातील परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रोहित्राने शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान अचानक पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली. आग लागल्याबरोबर आपोआपच वीज पुरवठा बंद झाला. यात जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
परळीमध्ये शॉर्टसर्किटमुळे पेटले रोहित्र, जीवितहानी नाही - PARALI FIRE
जिल्ह्यातील परळी शहरातील गंगासागर नगर भागातील रोहित्राने शुक्रवारी सकाळी अकराच्या दरम्यान अचानक पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात आग लागली.
fire
मोठ्या प्रमाणात रोहित्रचे नुकसान झाले आहे. त्या भागातील लाईट बंद करण्यात आली होती. अग्निशमन विभागाचे जवानांनी एक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे.