परळी वैजनाथ (बीड) - तालुक्यातील नंदनज येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात एक एकरावर लावलेली वांगी टाळेबंदी लागल्याने आणि बाजारपेठ बंद असल्याने तोडणी न करता तसेच ठेवले. यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नंदनज येथे वांगी उत्पादक शेतकऱ्याचे टाळेबंदीमुळे नुकसान
निसर्गापासून बचाव झाला पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा १० दिवस संपूर्ण टाळेबंदी केला आहे. यामुळे आलेल्या मालाची विक्री कशी आणि कुठे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आलेला माल विक्री करून किमान लागवडीचा खर्च तरी निघाला असता. यामुळे श्री. गुट्टे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नंदनज हे परळी शहरापासून जवळच असलेले गाव आहे. या गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लिंबोनी, कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या गावातील युवा शेतकरी श्रीकर प्रल्हाद गुट्टे यांची शेती आहे. शेताच्या जवळ तळे असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला करत असतात. हा भाजीपाला शहरातील बाजारपेठेत विक्री केला जातो. या भाजीपाल्यातून त्यांना चांगला फायदा होतो. यंदाही श्रीकर गुट्टे यांनी आपल्या शेतात एका एकरवर वांग्याची लागवड केली. यासाठी जवळपास ४० हजार रुपये खर्च आला. मेहनत करून वांग्याची चांगली जोपासना केली. यास मालही चांगला लागला. ऐन विक्री करण्याच्या वेळी टाळेबंदी लागू झाली. शेतकऱ्याने आपल्या पिकांची कितीही जोपासना केली तरी तो आलेला माल विक्री करून घरात पैसा येत नाही, तोपर्यंत याची काही हमी नसते. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला. सुदैवाने तालुक्यात ऐवढा मोठा पडला नाही. निसर्गापासून बचाव झाला पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा १० दिवस संपूर्ण टाळेबंदी केला आहे. यामुळे आलेल्या मालाची विक्री कशी आणि कुठे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आलेला माल विक्री करून किमान लागवडीचा खर्च तरी निघाला असता. यामुळे श्री. गुट्टे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
टाळेबंदीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती "कोरोना जगू देईना, सरकार खाऊ देईना' अशी झाली आहे. भाजीपाला हा तयार झाल्यानंतर जास्त दिवस शेतात ठेवताही येत नाही. तो नाशवंत आहे. यामुळे श्री.गुट्टे यांनी वांग्याची तोड न करता झाडावरच ठेवला आहे. कारण अगोदर लागवडीसाठी खर्च केला. आता तोडणसाठी खर्च करून तोडलेला माल कुठे विक्री करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण टाळेबंदीमध्ये दोनच तास भाजीपाला विक्रीसाठी दिले आहेत. दोन तासात गावाकडून यायचे पुन्हा परत जाऊन शेतात काम करायचे. यामुळे वांग्याचे शेतातच जाग्यावर मोठे नुकसान झाले आहे. शासनाने संपूर्ण टाळेबंदी करू नये. कोरोना संदर्भात जेवढे कडक नियम करायचे असतील तेवढे करावेत पण टाळेबंगी करू नये. टाळेबंदी करायची असेल तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी युवा शेतकरी श्रीकर गुट्टे यांनी केली आहे.