कोरोनाच्या संकटकाळात तहानेने व्याकूळ नागरिकांना टँकरची ओढ; राज्यातील काही भागात दुष्काळाची तीव्रता वाढली - Parbhani Water issue in lockdown
जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावे तसेच वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे. कोरोनाच्या संकटासोबतच गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना व लहान मुलांना मैलांवर पायपीट करावी लागत आहे.
कोरोनाच्या संकटासोबतच गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.
By
Published : May 20, 2020, 1:35 PM IST
|
Updated : May 30, 2020, 2:58 PM IST
मुंबई -उन्हाळा म्हटले की राज्यातील काही जिल्ह्याला दुष्काळाची झळ बसत असते. विहिरी, नाले, कुपनलिका, नद्या यांची पाणी पातळी एक तर खालावते किवा ती आटतात. अशावेळी राज्यातील जनतेला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याची झळ तहानेने व्याकुळ झालेल्या आबाल-वृद्धांसह जास्त प्रमाणात महिलांना बसत असते. या वर उपाययोजना म्हणून प्रशासन वाड्या, वस्ती, गावे या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करत असते. याचा आढावा ईटीव्ही भारतने या रिपोर्टद्वारे घेतला आहे.
जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावे तसेच वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे.
जिल्ह्यातील १२ तालुके टँकरमुक्त; आता केवळ चार तालुक्यांना टँकरद्वारे पाणी
नांदेडमध्येमागच्या वर्षी झालेल्या पावसाने ११ तालुक्यातील वार्षिक सरासरी ओलांडली होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम होता. त्यामुळे या उन्हाळ्यात अनेक वर्षांच्या तुलनेत कमी पाणीटंचाई जाणवली. त्यामुळे जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी १२ तालुके टँकरमुक्त असून केवळ चार तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या १३ टँकरच्या २९ फेऱ्या करुन या चार तालुक्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातून मूळ गावी जाणाऱ्यांची संख्या हजारोंवर आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची मागणी घटलीय. तसेच मजूर नसल्याने बांधकामं देखील खोळंबली आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई स्थानिकांसाठी नवी नाही. मात्र, यंदा पाणीटंचाईच्या झळा कमी असल्या तरीही मे महिन्याच्या अखेरीसही टँकरची मागणी कमी असल्याचे चित्र आहे.
शहरातील नागरीकांनी गाव जवळ केलं आहे. तर हॉटेल, बांधकाम, इतर व्यवसाय देखील ठप्प आहेत. शहरात खासगी टँकरची संख्या 150 वर आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत या टँकरचे पॉईंट आहेत. मात्र, सध्या मागणी नसल्याने वाहतूक खर्चही निघणे अवघड झाले आहे. मनपाच्या वॉटर बोर्डमधून देखील एकही टँकर धावत नाहीय. केवळ रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या झाडांची जोपासना करण्यासाठी एक टँकर कार्यरत आहे.
सांगलीतील दुष्काळी कलंक असणारा 'जत' यंदा पाणीटंचाईपासून मुक्त? अवघ्या ६ टँकरने पाणीपुरवठा
सांगली जिल्ह्यात कोरोनाची स्थिती कायम आहे. मात्र या स्थितीशी लढताना प्रशासनाला दुष्काळाशीही दोन हात करावे लागणार असे वाटत होते. मात्र, यंदा तसे काही घडताना प्रशासकीय पातळीवर दिसून येत नाही. कारण गेल्या वर्षी पाणी टंचाईशी झुंजणाऱ्या सांगली जिल्ह्यात आज हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच गावात पाण्याची टंचाई समोर आली आहे.
सांगलीतील जत तालुक्यात अवघ्या ६ टँकरने पाणीपुरवठा
२०१९ मे अखेरची जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती -
जिल्ह्यातील 181 गावातील 1 हजार 136 वाड्या-वस्त्यांना 188 टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला होता .
3 लाख, 76 हजार, 965 बाधित लोकसंख्येला व 51 हजार 135 पशुधनांना पाणी पुरवठा करण्यात आला होता.
यासाठी जिल्ह्यात एकूण 96 खासगी विहिरी/कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये जत आणि खानापूर तालुकयात दुष्काळाची अधिक तीव्रता पाहायला मिळाली होती.
एक नजर दुष्काळी "जत"ची २०१९ मे अखेरची स्थिती
जत तालुक्यातील 123 गावांपैकी 92 गावे टंचाईग्रस्त होती.
तर तालुक्यातील 671 वाड्यांमधील 2 लाख 23 हजार 131 ही बाधित लोकसंख्या होती.
सर्वाधिक 109 टँकर्सद्वारे तालुक्यात पाणी पुरवठा करण्यात आला होता.
अशी भीषण पाण्याची टंचाई गेल्या वर्षी जिल्ह्यात आणि विशेषत: जत तालुक्यात होती. मात्र, सध्या एकट्या जत तालुक्यात मे महिना संपत आला असताना केवळ ६ टँकर सुरू आहेत, तर २ ठिकाणी टँकरची मागणी आहे, अशी माहिती जत तालुक्याचे तहसीलदार यांनी दिली आहे. पूर्व भागातील ७ गावांमध्ये ही पाणी टंचाई निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोल्हापुरातून पाणी टंचाई गायब
एक नजर जत तालुक्यातील मे २०२० मधील सध्याची स्थिती -७ गावात ६ टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.तालुक्यात एकूण ३७ तलाव आहेत.पैकी १८ तलाव सध्या कोरडे पडले आहे.
नाशकात 35 टँकरद्वारे 45 हजार नागरिकांची भागवली जाते 'तहान'
नाशकातील ग्रामीण भागातील जलाशय आटून गेल्याने नागरिकांना कोरोनाच्या काळात पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने त्यांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने ही बाब ओळखून नाशिकच्या ग्रामीण भागात 33 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. या माध्यमातून 45 हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे.
जिल्ह्यातील येवला, पेठ, सुरगाणा, बागलाण, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, देवळा या सात तालुक्यातील 54 गावे 22 वाड्या अशा एकूण 76 ठिकाणी 35 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या ठिकाणच्या 45 हजार नागरिकांची तहान भागवली जात आहे. 35 टँकरद्वारे 70 फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून तेथे पाणी पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने विहिरी केल्या अधिग्रहित
काही गावातील विहिरीमधे मुबलक प्रमाणात पाणी असते. मात्र या विहिरी खासगी मालकीच्या असल्या, तरी टंचाई काळात प्रशासन त्या गावकऱ्यांसाठी अधिग्रहित करता येतात. अशा 59 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी 49 विहिरी गावासाठी आणि 10 विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात किती सुरू आहेत टँकर
तालुका
गावे
टँकर
देवळा
3
2
बागलाण
3
2
सुरगाणा
18
7
पेठ
17
7
येवला
25
13
नांदगाव
1
1
त्र्यंबकेश्वर
9
3
एकूण
76
35
कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोल्हापुरातून पाणी टंचाई गायब
शहरात महानगरपालिकेचे एकूण 13 टँकर आहेत. पालिकेने इतर संस्थांकडून 40 टँकर घेतले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्याप मुबलक पाणीसाठा असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवण्याची गरज निर्माण झाली नाही. जेव्हा टंचाई भासेल तेव्हा सुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी शहरात जे 530 बोअर आहेत, त्यांच्यामार्फत पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महापौर निलोफर आजरेकर यांनी याबाबत माहिती दिली.
महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे कोल्हापुरातून पाणी टंचाई गायब
शहरातील एकूण 530 बोअरचे सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्या बोअरच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. त्याचा वापर पाणी टंचाईच्या वेळी करण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी ज्याप्रकारे शहराला पाण्याची टंचाई भासते त्या तुलनेत यावर्षी नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असेही महापौर म्हणाल्या.
महानगरपालिकेचे टँकर आणि उपाययोजना -
शहरात महामगरपालिकेचे एकूण 13 टँकर आहेत. तर जवळपास 40 खासगी टँकर इतर संस्थांकडून घेण्यात आले आहेत. असे 53 टँकर शहरात आहेत. गेल्यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाण्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मात्र, यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्याची अद्याप कोठेही टंचाई जाणवलेली नाही. ज्या ठिकाणी अगदीच मोठी अडचण आहे, त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, असे क्वचितच होत असल्याचे महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगतले.
कोरोनाच्या संकटासोबतच गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.
पाणीपुरवठा समस्येसाठी पालिकेकडून हेल्पलाईन नंबर -
पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी किंवा अडचणी असतील तर नागरिकांनी 9766532010 आणि 9766532016 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सुद्धा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यात लॉकडाऊन व निसर्गाच्या मदतीमुळे यावर्षी पाणी टंचाई नाही
यावर्षी भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नाही. असे असले तरी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद भंडारा तर्फे पाणीटंचाईसाठी नियोजन केले गेले असून लॉकडाऊनच्या काळातही पाणीटंचाईचे काम सतत सुरू राहिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत 877 गावांसाठी 1 हजार 163 उपाययोजना करण्यात आल्या आहेत.लॉकडाऊनच्या काळातही पाणीटंचाईचे काम सतत सुरू राहिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत 877 गावांसाठी 1 हजार 163 उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये 639 बोरवेल, 177 विहीर खोलीकरण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती 107, विंधन विहिरींची दुरुस्ती 263 आणि विहीर अधिग्रहण 4 या योजनांचा समायोजन आहे. यापैकी आत्तापर्यंत 665 गावांमध्ये 879 योजना मंजूर होऊन 196 गावातील 316 कामे पूर्ण झाली आहेत
हिंगोलीतील 'या' गावातील नागरिकांना 'पसापसा' पाण्यासाठी हिंडावे लागते 'रानोमाळ'
भीषण पाणीटंचाई; सोईसुविधा असूनही हिंगोलीतील 'या' गावातील नागरिकांना 'पसापसा' पाण्यासाठी हिंडावे लागते 'रानोमाळ'
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच जण हतबल झालेले आहेत. त्यातच बऱ्याच गावात पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले आहे. मात्र ज्या गावात सरकारी विहिरीला तुडूंब पाणी आहे, गावात जलशुद्धीकरण केंद्र आहे, अशा गावातही भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. आज या विदारक परिस्थितीत ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ येत आहे. शिवाय गावात बाहेरून येणाऱ्या अन् जाणाऱ्यांवर पण ग्रामपंचायतचे अजिबात लक्ष नसल्याचे ग्रामस्थ संगत आहेत. वसमत तालुक्यातील रांजोना असे या गावाचे नाव आहे.
सरकारी विहिरीला प्रचंड पाणी आहे. शिवाय ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून, जलशुद्धीकरण देखील बसविण्यात आले आहे. ग्रामस्थांची भटकंती थांबवण्यासाठी दारोदार नळ देखील दिले आहेत. मात्र त्या नळाला एक दोन वेळा वगळता कधीच पाणी आलेले नाही. शिवाय जलशुद्धीकरण केंद्र केवळ बसवल्याचे माहीत झाले. परंतु उन्हाळा संपत आला असला, तरी अजून शुद्ध पाणी पिण्याची संधी मिळालेली नसल्याचे ग्रामस्थ मोठ्या पोट तिडकीने सांगत आहेत.
रायगडमधील 12 तालुक्यातील 331 गावात 62 हजार नागरिक तहानलेले
राडगड जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत असताना पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहेत.जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 331 गाव, वाड्यातील 62 हजार 479 नागरिक पाणी टंचाईमुळे तहानलेले आहेत. या नागरिकांना 33 टँकर आणि 4 विहिरीमार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई सुरू होते. जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यावर्षी नऊ कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मुरुड आणि तळा या बारा तालुक्यातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे.
टँकर
जालना जिल्ह्यात पाणीटंचाई, टँकर भरण्यासाठी 35 विहिरी अधिग्रहीत
जालन्यात मागील वर्षी पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस पडला होता. मात्र, मान्सून परतल्यानंतर मुसळधार पावसाने अवघ्या पंधरा दिवसांतच चार महिन्यांची कसर भरून काढली. त्याचा परिणाम असा झाला, की आज जालना जिल्ह्यातील फक्त 37 गावे आणि 16 वाड्यांना 40 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.उन्हाळा संपत आला असून केवळ 40 टॅंकरच्या माध्यमातून 81 खेपा मंजूर आहेत. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 92 हजार 213 लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये सर्वात जास्त टँकरच्या खेपा अंबड तालुक्यात होत असून ही संख्या 32 आहे. त्यापाठोपाठ बदनापूर मध्ये 27, जाफराबाद मध्ये 12 आणि जालना तालुक्यात 10 अशा एकूण 81 खेपा मंजूर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 68 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घनसांगी 18, अंबड 14, बदनापूर 18,जालना 5, जाफराबाद 8 अशा एकूण 68 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
परभणी : टाळेबंदीचा 'असा'ही फायदा; टँकरलॉबीचे सुटले ग्रहण
टाळेबंदीमुळे बहुतांश व्यवसाय आणि वाहतूक बंद असल्याने शहर व जिल्ह्यात पाण्याचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात निर्माण होणारी पाणीटंचाई गायब आहे. त्यामुळे जिल्ह्यात व शहरात एकाही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही.
शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून आठ दिवसांनी पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्ह्याला लागलेले टँकरलॉबीचे ग्रहण यावेळी सुटले, असेच म्हणावे लागेल. काही तालुक्यांमधील किरकोळ पाणीटंचाई लक्षात घेता, ग्रामीण भागातील 20 विहिरी मात्र प्रशासनाकडून अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
परभणीवरील टँकर लॉबीचे सुटले ग्रहण
कोरोनाच्या संकटकाळात बीडकर तहानेने व्याकूळ
जिल्ह्यातील दीडशेहून अधिक गावे तसेच वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे. कोरोनाच्या संकटासोबतच गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. हंडाभर पाण्यासाठी महिलांना व लहान मुलांना मैलांवर पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यांपैकी आष्टी व धारूर तालुक्यांत सर्वाधिक पाणीटंचाई आहे. त्यापाठोपाठ बीड, पाटोदा, गेवराई व अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सध्या जिल्ह्यात 47 गावे व 35 वाड्यांना 100 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील माजलगाव बॅक वॉटर येथून आठ दिवसाने एकदा पाणीपुरवठा होतो. पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 140 विहिरी व बोअर अधिग्रहीत केल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण 144 लघू व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. त्यात जवळपास 29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शहरी भागांमध्ये आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिला व मुलांना पायपीट करावी लागत आहे. सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात प्रशासन व्यग्र आहे. अनेक ग्रामपंचायतींकडून टँकरची मागणी होत आहे. पाण्यासाठी महिलांचा जीव धोक्यात
बीडमध्ये धारूर आणि तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये धारुर तालुक्यातील मुन्ना नाईक तांडा व बीड तालुक्यातील लिंबागणेश, बोरखेड, पोखरी वस्ती आदी ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल सुरू आहेत. नाईक तांड्यावर चक्क महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायऱ्या नसलेल्या विहिरीत उतरावे लागते. यामुळे कोरोनापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष तीव्र होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक गावांतील नागरिकांनी पाणी टचाईबाबत ओरड केलेली नाही. मात्र बीड येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात बीड जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांवर तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्याचे संस्थेच्या प्रमुख मनीषा घुले यांनी सांगितले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी झालेल्या पावसामुळे शहरी भागात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. मात्र अनेक वाडी तांड्यावर पाण्याचा तुटवडा भासू लागला. सोनमांजरी गावात हंडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. मागीलवर्षी झालेल्या पर्जन्यमानाच्या सरासरी 106 टक्के पावसाने नांदेड जिल्हा सुखावला होता. या पावसानं आजही जलस्रोत वाहत आहेत. असं असले, तरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र अनेक वाडी तांड्यावर पाणी टंचाई भासत आहे.
जिल्ह्यातील एकंदरीत दुष्काळ परिस्थितीसोनमांजरी सारखी पाणी टंचाई जिल्ह्यात अनेक वाडी तांड्यावर दिसून येत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दोन गावं आणि पाच वाड्या टंचाईग्रस्त आहेत. नांदेड आणि किनवट या तालुक्यात प्रत्येकी एक गाव टंचाईग्रस्त आहे, तर मुखेड तालुक्यातील पाच वाड्यांचा समावेश आहे.
पाणी पुरवठ्यासाठी 68 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित
टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी 57 गावात 68 ठिकाणं विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित केली आहेत. तर एकूण सात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.