बीड- आमदारांचा विकास म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने’ असा आहे. त्यांनी मतदारांना ग्रृहीत धरू नये. जनतेने ठरवले आहे, आता बदल करायचा आहे. केलेल्या विकासकामांवर बोलूनच मी मते मागत आहे. मला आता विधानसभेत काम करण्याची संधी द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले आहे. आपल्या ठिकठिकाणच्या कॉर्नर बैठकीत ते मतदारांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये आपल्या 'कॉर्नर बैठकांचा' धडाका लावला आहे. त्यांच्या कॉर्नर बैठकांना प्रचार सभांचे स्वरुप प्राप्त होत आहे. मतदारांशी थेट संवाद साधताना ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासासाठी मोठा विकास निधी खेचून आणला. तालुक्याला नेहमीच झुकते माप दिलेले आहे. तो विकास मतदारांना दिसतो आहे. विरोधकांचा विकास मात्र अद्यापही अदृश्यच आहे. आम्ही केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहे. दरम्यान विकासाची आणि जमेची बाजू उपस्थितांना पटवून देत असल्याने मतदारांमधून विजयसिंह पंडित यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
हेही वाचा-संदीप क्षीरसागर शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार