बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नागझरी येथे दोन गटात तुफान तलवारबाजी झाली. यामध्ये एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. नागझरी येथील पारधी वस्तीवर हा प्रकार घडला आहे. शुल्लक कारणावरून हा वाद उफाळला असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
बीडमध्ये दोन गटात तुफान तलवारबाजी; एक ठार, एक गंभीर - जखमी
शुल्लक कारणावरून हा वाद उफाळला असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.
उत्तरेश्वर भारत पवार (वय- 20 रा.नागझरी ता. गेवराई) असे हाणामारीत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. नारायण भारत पवार (वय 26) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरेश्वर पवार व नारायण पवार हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. पारधी वस्तीवर दुसऱ्या एका गटाकडून किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली व याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. शेवटी तलवारीने वार करण्यापर्यंत हे भांडण पोहोचले. यामध्ये एकाचा खून झाला आहे. संबंधित आरोपी फरार झाला असून गेवराई पोलीस त्याचा शोध घेत आहेत.