बीड पोलिसांच्या श्वानपथकातील 'रॉकी'चे निधन - beed police news
बीड पोलीस दलाच्या श्वानपथाकातील रॉकी या श्वानाचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 15 ऑगस्ट) निधन झाले आहे.
![बीड पोलिसांच्या श्वानपथकातील 'रॉकी'चे निधन rocky](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:54:15:1597483455-mh-bid-01-rokinidhan-7204030-15082020144935-1508f-1597483175-906.jpg)
rocky
बीड- बीड पोलीस दलात अनेक वर्षे पोलिसांच्या बरोबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी काम करणारा श्वानपथकातील रॉकी या श्वानाचे शनिवारी निधन झाले. रॉकीचे गुन्हे शोधक पथकात मोठे योगदान होते. त्याच्या निधनामुळे बीड पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागील काही दिवसापांसून श्वान रॉकी आजारी होता. यामुळे 15 ऑगस्टला त्याचे निधन झाले. रॉकी अत्यंत हुशार श्वान असल्याने अनेक गुन्हे उघडकीस करण्यासाठी त्याची पोलिसांना मदत झाली होती, अशी माहिती बीड पोलिसांनी दिली आहे.