महाराष्ट्र

maharashtra

अंबेजोगाई : स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर करतात रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम

By

Published : May 6, 2021, 7:01 PM IST

रुग्णांना आधार देण्याचे काम स्वाराती रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तंत्रज्ञ करत आहे. रुग्ण सेवेमुळे त्यांना त्यांच्या परिवारालाही वेळ देणे शक्य होत नाही.

doctors at Swarati Hospital provide mental support to patients
अंबेजोगाई : स्वाराती रुग्णालयातील डॉक्टर करतात रुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम

अंबाजोगाई (बीड) -डॉक्टरांचे आपुलकीचे शब्द ऐकून अनेक रुग्णांना आधार मिळतो. कोरोनासारख्या महामारीत जेथे नातेवाईकही जवळ येत नाही. अशा वेळी डॉक्टर किंवा परिचारिका यांची जबाबदारी अजून वाढते. या लोकांना आधार देण्याचे काम स्वाराती रुग्णालयातील काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तंत्रज्ञ करत आहे. सर्व रुग्णांना चहापाणी, नाष्टा, जेवण औषध घेतात की नाही, सलाईन चालू आहे का, अंघावर पांघरुण टाकत, लघवी संडास काढत साफसफाई, स्वछतेसाठी दिवस रात्र राबत आहेत.

चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे -

स्वाराती रुग्णालयाचा गौरव शाली इतिहास आहे. इथे चांगला उपचार होतो, म्हणून मराठवाड्यातून रुग्ण येतात. सध्या कोरोना काळामुळे गर्दी खूप आहे. उपलब्ध साधनसामग्रीत आमची सर्व टीम चांगला उपचार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे यांनी सांगितले.

हेही वाचा - सख्ख्या बहिणीचे नवऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, 'तिच्या' 3 वर्षांच्या मुलाचा केला खून

ABOUT THE AUTHOR

...view details