महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - बीडचे कोटेचा दाम्पत्य बनले कोरोना रुग्णांसाठी देवदूत - बीड जिल्हा न्यूज अपडेट

कोरोना महामारीच्या संकटात रुग्णसेवेचा एक उत्तम नमुना बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. बीडच्या डॉक्टर कोटेचा दाम्पत्याने तीन महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्णांची तपासणी केली. एवढेच नव्हे तर कोरोमुळे ज्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे.

बीडचे कोटेचा दाम्पत्य बनले कोरोना रुग्णांसाठी देवदूत
बीडचे कोटेचा दाम्पत्य बनले कोरोना रुग्णांसाठी देवदूत

By

Published : Jun 13, 2021, 8:39 PM IST

बीड - कोरोना महामारीच्या संकटात रुग्णसेवेचा एक उत्तम नमुना बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. बीडच्या डॉक्टर कोटेचा दाम्पत्याने तीन महिन्यात तब्बल साडेतीन हजार रुग्णांची तपासणी केली. एवढेच नव्हे तर कोरोमुळे ज्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, अशा रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. बीड जिल्ह्यात कोरोना उपचाराच्या डॉ. कोटेचा पॅटर्नमुळे जिल्ह्यातील शेकडो गोरगरीब रुग्णांना उपचारांबरोबरच आधार मिळाला आहे. त्यांच्या कामाचे आरोग्यविभागाकडून देखील कौतुक करण्यात आले आहे.

मार्च 2019 च्या सुरुवातीपासूनच संपूर्ण राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला होता. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नाहीत. एकंदरीतच ग्रामीण भागातील जनता कोरोनाच्या संकटामुळे भयभीत झाली होती. अशा बिकट काळात बीडच्या डॉ. विशाल व अश्विनी कोटेचा या दाम्पत्याने मनोभावे आरोग्यसेवा करून, कोरोना रुग्णांचे जीव वाचवले. मार्च ते मे 2021 या तीन महिन्यांच्या कार्यकाळात डॉ. कोटेचा दाम्पत्याने साडेतीन हजार रुग्णांची तपासणी केली, बीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारांबरोबरच आधार दिल्यामुळे अनेक रुग्ण कोरोनाच्या संकटातून बाहेर पडले आहेत, असे डॉक्टर विशाल कोटेचा यांनी सांगितले.

बीडचे कोटेचा दाम्पत्य बनले कोरोना रुग्णांसाठी देवदूत

गंभीर रुग्णांना दिले जीवदान

एप्रिल महिन्यामध्ये बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नव्हते याशिवाय रुग्णांना खासगी रुग्णालयाचा खर्च परवडणारा नव्हता, मात्र डॉ. विशाल व अश्विनी कोटेचा यांनी सिटीस्कॅनचा स्कोर 24 असलेल्या एका रुग्णाला उपचारांबरोबरच आधार दिला. संबंधित रुग्णाचे वय पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक होते, जेव्हा तो रुग्ण डॉक्टर कोटेचा यांच्याकडे ऍडमिट झाला तेव्हा त्याची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मात्र त्या रुग्णाला योग्य उपचार मिळाल्यामुळे या रुग्णाचे प्राण वाचले.

16 ते 18 तास केले काम

ज्यावेळी बीड जिल्ह्यात प्रतिदिनी बाराशे ते पंधराशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव जाणवू लागला होता. अशा नाजूक परिस्थितीत आम्ही 16 ते 18 तास रुग्णसेवा करत होतो. एवढेच नाही तर त्या काळात बीड परिसरात फिजिशियनची देखील कमतरता होती. अशावेळी बीड जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना उपचार व आधार देण्याची जबाबदारी आमच्यावर होती. अशी प्रतिक्रिया डॉक्टर विशाल कोटेचा यांनी दिली आहे.

हेही वाचा -पुराच्या पाण्यात रस्ता ओलांडण्याचा वृद्धाचा प्रयत्न, पहा काय झाले पुढे

ABOUT THE AUTHOR

...view details