महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Beed Crime पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करत डॉक्टर पतीने काढले घराबाहेर, ७ नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल - महिलेचा शारीरिक व मानसिक छळ

डॉक्टर पतीने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार ( Unnatural Relation With Wife ) करत घराबाहेर काढल्याने खळबळ उडाली. ही घटना बीड जिल्ह्यातील धर्मापुरीत घडली. त्यामुळे पीडितेच्या तक्रारीवरुन डॉक्टरसह ( Doctor Booked For Unnatural Relation With Wife ) त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉक्टर नातेवाईकांसह फरार झाला आहे. परळी ग्रामीण पोलीस ( Parli Police Station) या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Doctor Booked In Beed
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 2, 2023, 1:13 PM IST

Updated : Jan 2, 2023, 3:15 PM IST

बीड -परळीत डॉक्टरने 29 वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ( Unnatural Relation With Wife ) करत अत्याचार केला. तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना धर्मापुरीत घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टरसह ( Doctor Booked For Unnatural Relation With Wife ) त्याच्या 7 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंधपरळी तालुक्यातील धर्मापुरी येथे बीएचएमएसचे शिक्षण घेतलेला डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करत आहे. त्याने 29 वर्षीय पत्नीसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ( Unnatural Relation With Wife ) ठेवत तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला. त्यामुळे पीडित महिलेने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात ( Parali Police Station ) तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं 313 / 2022 कलम 377, 498 अ, 323, 504, 34 भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी डॉक्टर व त्याचे 7 नातेवाईक फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ( Doctor Booked In Beed ) ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक खोडेवाड ( Beed Crime ) हे करीत आहेत.

महिलावरील अत्याचाराच्या घटनेत वाढबीड जिल्ह्यात महिलावरील अन्य अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे 2022 मध्ये एक वर्षात विवाहित महिलावरील अन्याय अत्याचाराच्या घटनांचा आकडा पाचशेच्या जवळपास गेला आहे. उच्चशिक्षित कुटुंबातील व्यक्तीकडूनही महिलांवर अन्याय होत असल्याच्या घटना घडत आहेत. याविषयी Etv Bharat ने 2022 मध्ये घडलेल्या सर्व घटना समोर आणल्या होत्या. 2023 च्या पहिल्याच रात्री चक्क एका डॉक्टरांनी आपल्या पत्नीवर अत्याचार करत आपल्या डॉक्टर पत्नीला घराच्या बाहेर काढल्याची ( Doctor Beaten To Wife In Beed ) घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी डॉक्टरांकडून कोणता आदर्श घ्यावा, हाच प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

Last Updated : Jan 2, 2023, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details