महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक...! कोरोना कक्षात काम करणारे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा अहवाल 'निगेटिव्ह' - Beed corona cure patients

कोरोना कक्षात मागील अनेक दिवसापासून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी काम केले आहे. काही दिवस त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कोरोना कक्षात कर्तव्यावर पाठवताना त्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कोरोना बाबतची तपासणी केली असता सर्व आरोग्य कर्मचारी यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Beed corona update
बीड कोरोना अपडेट

By

Published : Jun 4, 2020, 10:34 PM IST

बीड -मागील अनेक दिवसापासून कोरोना योद्धे म्हणून कोरोना वार्डात काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांचे तपासणी नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्व कोरोना योद्ध्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात 19 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 6 जणांना शुक्रवारी डिस्चार्ज करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बुधवारी 35 आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुने प्रयोग शाळेकडे पाठवले होते. गुरुवारी त्या सर्व जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे.

कोरोना कक्षात मागील अनेक दिवसापासून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी काम केले आहे. काही दिवस त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कोरोना कक्षात कर्तव्यावर पाठवताना त्या सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कोरोना बाबतची तपासणी केली असता सर्व आरोग्य कर्मचारी यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आरोग्य कर्मचारी आणि इतर नागरिकांचे 12 नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. यातील या 19 मधील देखील सहा रुग्ण बरे झालेले आहेत. त्यांना शुक्रवारी सुट्टी देण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details