महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्ही काय पाकव्याप्त काश्मिरात राहतो का? रेमडेसिवीरवरून सुरेश धस संतप्त - बीड कोरोना अपडेट

आम्ही काय पाकव्याप्त काश्मिरात राहतो का? रेमडेसिवीरवरुन सुरेश धस जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त झाले. त्यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.

बीड
बीड

By

Published : Apr 23, 2021, 6:00 PM IST

आष्टी(बीड) -आम्ही काय पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहोत काय? आष्टी, शिरूर तालुका पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे काय?, आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन्स का मिळत नाहीत, असा संतप्त सवाल भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. यावेळी ते म्हणाले आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचेत तर करा, इथे राहण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन राहू. त्यांनी गुरुवारी (दि. 22) दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली. यावेळी धस यांनी अन्न औषध प्रशासनालाही चांगलेच धारेवर धरले. काही खासगी औषधी विक्रेत्यांच्या काळ्याबाजाराचाही इथे उहापोह करण्यात आला. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनीही खुर्चीवरुन उठून धसांच्या प्रत्येक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मागच्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजन तुटवडा जाणवत आहे. उपलब्ध करताना प्रशासनाचीही मोठी कसरत होत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाईक दोन-दोन दिवस ठाण मांडून बसत आहेत. तरीही इंजेक्शन भेटण्याची खात्री नाही. दरम्यान, याच मुद्द्यावर सुरेश धस बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. लोक रात्रंदिवस रेमडेसिवीर इंजेक्शन्साठी इकडे-तिकडे फिरत आहेत. तुम्ही नुसते कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप करत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खासगी रूग्णालयांतले इंजेक्शन जप्त करत आहेत. मात्र, ते जातात कुठे असा सवालही धसांनी केला. रेमडेसिवीर इंजेक्शन व्यवस्थितपणे सर्वांना मिळाले नाही तर आंदोलन करू, असा इशाराही धसांनी दिला. आक्रमक झालेल्या धसांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी वितरणाची व उपलब्धतेची सर्व इत्यंभूत माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धस यांच्या समवेत आमदार लक्ष्मण पवार होते.

ABOUT THE AUTHOR

...view details