महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीची आत्महत्या - suicide news

मृत व्यक्तीच्या खिशात चिठ्ठी सापडली असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले आहे.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन
शिवाजीनगर पोलीस स्टेशन

By

Published : Jan 19, 2021, 4:45 PM IST

बीड- बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका नर्सरीच्या लगत असलेल्या शेडच्या अडूला 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मृत व्यक्तीच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले आहे.

किशोर हे दोन्ही पायांनी दिव्यांग होते-

किशोर रोहिदास साळवे (वय- 35 रा. नाळवंडी नाका, बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर साळवे यांनी बीड शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील मोहिमाता नर्सरी शेजारी असलेल्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. किशोर हे दोन्ही पायांनी दिव्यांग होते. त्यांची पत्नी देखील मूकबधिर आहे.

किशोर साळवे यांच्या खिशात चिठ्ठी आढळली-

मृत किशोर साळवे यांच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. त्या चिट्टी मध्ये काही महिलांची नावे आहेत. मी आत्महत्या करत आहे. एवढाच उल्लेख किशोर यांनी केलेला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार चिट्टी मधून आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नाही. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

हेही वाचा-पनवेल पालिका क्षेत्रात 11 जणांवर कोरोना लसीचे साईड इफेक्ट; उलटी, तापाची लक्षणे

ABOUT THE AUTHOR

...view details