बीड- मराठवाड्यात सर्वत्रच कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. या संदर्भात औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी (आज) बीड जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. साेबतच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना निवारणार्थ योग्य त्या सूचनाही अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाय-योजना करणे आवश्यक झाले आहे. यासाठीच बुधवारी (आज) कोरोना परिस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतला आहे. मृत्यू दर कमी करण्यासंदर्भात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याशिवाय कोविड सेंटरमधील व्यवस्था देखील सुरळीत करा, असे निर्देशही केंद्रेकर यांनी यावेळी दिले आहे.
..तर कारवाई होणार
जिल्ह्यात कोरोना अधिक गतीने वाढू नये. यासाठी जी खबरदारी घ्यायची आहे, त्याबाबत योग्य त्या सूचना यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी व आता बैठकीत मी दिलेल्या आहेत. आपली कामे वेळेत व काळजीपूर्वक करा, कर्तव्यात बेजबाबदारीने वागाल तर कारवाई करणार. अशी तंबी देखील यावेळी सुनील केंद्रेकर यांनी बैठकीतील उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली आहे.
विना मास्क फिरणाऱ्या वर कारवाई करा