महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंधन दरवाढीच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने माजलगांवात धरणे आंदोलन

दिवसेंदिवस गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत.

By

Published : Feb 9, 2021, 7:56 PM IST

संभाजी ब्रिगेडच्या वतीने माजलगांवात धरणे आंदोलन
संभाजी ब्रिगेडच्या वतीने माजलगांवात धरणे आंदोलन

बीड - दिवसेंदिवस गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिक अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे त्रस्त-

केंद्र सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने केलेल्या आंदोलनामध्ये डिझेल पेट्रोल व गॅसचा मुद्दा लावून धरला आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिक अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अशा बिकट परिस्थितीत केंद्र सरकारने इंधनाचे दर अवाच्या सव्वा वाढवले आहेत. अनेक नागरिकांचे आर्थिक नियोजन महागाईमुळे बिघडत आहे. याकडे केंद्र सरकारने विशेष लक्ष देऊन महागाई कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने माजलगांवात धरणे आंदोलन

या अगोदर देखील संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महागाई विरोधात वारंवार आंदोलने केलेली आहेत. केंद्र सरकार महागाईच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याचा आरोप यावेळी संभाजी ब्रिगेडच्या माजलगाव येथील पदाधिकाऱ्यांनी केला.

हेही वाचा -भारतरत्नांची चौकशी घरी जाऊन नाही, केवळ ट्विटची माहिती घेणार - छगन भुजबळ

ABOUT THE AUTHOR

...view details