बीड - प्रीतम मुंडे बीड लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता रेल्वेमध्ये बसूनच येणार आहेत का? असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. २०१९ पर्यंत रेल्वे आणण्याचा शब्द मंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीडकरांना दिला होता. मात्र, २०१९ पर्यंत बीडला रेल्वे येऊ शकली नाही. यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दोन्ही बहिणीला टोला लगावला आहे.
प्रीतम मुंडे रेल्वेत बसूनच उमेदवारी अर्ज भरायला येणार का? धनंजय मुंडेंचा टोला - धनंजय मुंडे
बीड जिल्ह्यात लाखांच्या सभा आम्ही यापूर्वी केलेल्या आहेत. सभा आणि रॅली काढण्यामध्ये आमचा नाद कोणी करायचा नाही? असेही धनंजय यावेळी म्हणाले.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा उमेदवारी अर्ज २५ मार्चला भव्य रॅलीसह दाखल करण्याबाबत निवेदन देऊन प्रशासनाकडून परवानगी मिळवली होती. मात्र, भाजपच्या उमेदवाराला त्याच रस्त्यावरून रॅलीला परवानगी दिली. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला परवानगी नाकारण्यात आली. एका पक्षाला रॅलीसाठी परवानगी दिली असताना, दुसऱ्या पक्षाला परवानगी न देणे हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र, तरीही दबावाखाली येऊन परवानगी देण्यात आली. निवडणुकींच्या काळात वारंवार अशी दडपशाही होऊ नये यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांसह, जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असंेधनंजय मुंडे म्हणाले. तसेच बीड जिल्ह्यात लाखांच्या सभा आम्ही यापूर्वी केलेल्या आहेत. सभा आणि रॅली काढण्यामध्ये आमचा नाद कोणी करायचा नाही? असेही धनंजय यावेळी म्हणाले.