महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dhananjay Munde : मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण करून सिंचनासाठी पाणी सोडा; धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र - Demand complete work of left canal of Manjra Dam

पाण्याअभावी परळीतील पिके सुकू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी पाटबंधारे विभागास पत्र लिहीले ( Demand complete work of left canal of Manjra Dam ) आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे काम पूर्ण करून तातडीने सिंचनासाठी पाणी सोडाण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली (Dhananjay Munde letter Irrigation Department ) आहे.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे

By

Published : Jan 5, 2023, 5:15 PM IST

परळी :बीड व लातूर जिल्ह्याची जलवाहिनी असलेले मांजरा धरण याही वर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाच्या कालव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण केली जावीत, त्याद्वारे शेती सिंचनासाठी नियमित पाणी सोडले जावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी एका पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली ( Dhananjay Munde letter Irrigation Department ) आहे.

अनेक गावांना पाणीपुरवठा :या धरणातून जाणाऱ्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या अनेक तालूक्यांना पाणी सोडले जाते. अंबाजोगाई व केज या दोन तालुक्यातील आवाड शिरपुरा, नायगाव, सौंदना, इस्थळ, आपेगाव, धानोरा (बु.) कोपरा-अंजनपूर, देवळा, पाटोदा, ममदापुर, अकोला, मुडेगाव, सुगाव, तडोळा आदी गावांतील सुमारे 10 हजार 558 हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येते. हा संपूर्ण भाग अत्यंत सुपीक असून या पाण्याच्या भरोशावर या भागातील शेतकरी ऊस व तत्सम रब्बी हंगामातील पिके ( Crops damage due to lack of water ) घेतात.

धनंजय मुंडेंचे पाटबंधारे विभागास पत्र :रब्बी हंगामामध्ये डिसेंबर महिन्यातच मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडणे अपेक्षित असून अद्याप या कालव्याची देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण न झाल्याने तसेच कालवा सल्लागार समितीची बैठक वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांना अद्याप डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पत्रात ( Demand complete work of left canal of Manjra Dam ) म्हणतात. या भागातील पिके पाण्याअभावी सुकू लागले असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी कळवले असून ऊसाला देखील दोन आठवड्यांच्या आत पाणी न मिळाल्यास उसाचे पीक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धनंजय मुंडेंची मागणी :धनंजय मुंडेंनी पुढील प्रमाणे मागणी केली आहे.मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी व नैसर्गिक गरज लक्षात घेत सदर कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण केली जावीतअसे त्यांनी पत्रात म्हणटे आहे. त्याशिवाय, धानोरा बुद्रुक येथील लोखंडी पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण केले जावे. डाव्या कालव्याद्वारे नियमित सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार त्यांच्या कार्यालयाकडून पाटबंधारे लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता याना देण्यात आले ( Dhananjay Munde demand release water for irrigation ) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details