परळी (बीड) - परळी औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणारी राख, वडगाव येथील साठवण केंद्र यासह राख वाहतुकीमुळे परळी व परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या विरुद्ध परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजदंड उगारला आहे. काहीजण राखेची अवैध साठवणूक करत आहेत. वाहतूक करणारी बरीच वाहने बोगस नंबर प्लेट असलेली आहे. राख वाहतुकीच्या बाबतीतील नियम पाळताना दिसून येत नाहीत. पर्यायाने नागरिकांना या वाहतुकीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त बैठक घेतली. यात संबंधित औष्णिक विद्युत केंद्र, पोलीस व वाहतूक शाखेतील अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी यांना सक्तीची पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
अवैधरित्या साठवणूक केलेले राखेचे साठे जप्त करून त्यावर कडक कार्यवाही करावी. अवैध वाहनांवर जप्ती आणून त्या वाहन धारकांवर कार्यवाही करावी. तसेच शहरातून वाहतूक केली जाणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी राख वाहतुकीसंदर्भात आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करावे, असे सक्तीचे निर्देश मुंडे यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
परळीतील राख वाहतूक आणि प्रदूषणाविरुद्ध धनंजय मुंडेंनी दिले निर्देश - धनंजय मुंडे बातमी
शहरातून वाहतूक केली जाणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर नियमानुसार वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी राख वाहतुकीसंदर्भात आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करावे.असे सक्तीचे निर्देश मुंडे यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
रस्त्यावर सांडलेली राख साफ करावी
राख वाहतूक करताना वाहनांमधून रस्त्यावर राख बऱ्याच प्रमाणात सांडते. या राखेला सक्षन मशीनच्या साहाय्याने साफ करावे, यासाठी नगर परिषदेची मदत घ्यावी. तसेच सक्षन मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रमाणात धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच उर्वरित निधी औष्णिक विद्युत केंद्राच्या सामाजिक उत्तर दायित्व निधी (सीएसआर)मधून उपलब्ध करून द्यावा, असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी सांगितले आहे. दरम्यान राख वाहतूक करताना राख ओली करून व त्यावर कपडा झाकून ठेवावा असा नियम आहे. मात्र अनेक वाहनधारक असे करत नाही. त्यामुळे परळीकर नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. याचाच विचार करत धनंजय मुंडे यांनी याकडे गांभीर्याने पाहत हे निर्देश दिले आहे.
हेही वाचा-वीज बिल माफीसाठी दुबळे मंत्री बारामती समोर उभे राहू शकत नाहीत - प्रकाश आंबेडकर