बीड :उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. 17 ऑगस्टच्या सभेत शरद पवारांनी सांगितलं की 'बीड जिल्ह्याने शरद पवारांवर खूप प्रेम केलं.' मात्र, प्रेमापोटी शरद पवारांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? असा सवाल धनंजय मुंडे यांनी शरद पवारांना केला आहे.
शरद पवारांनी काय दिलं? पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, मला अनेकांनी विचारलं होतं की, तुमची सभा शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी होणरा आहे का? मी नम्रपणे कार्यकर्त्यांना जनतेला सांगितलं, की ही सभा 'उत्तरे' देण्यासाठी नाही तर, बीडच्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे. शरद पवारां सांगतात बीडने खूप प्रेम दिलं, मात्र, विकासाच्या दृष्टीने अजित पवारांनी 'जबाबदारी' दिली. त्यामुळे ही सभा उत्तरदायीत्वाची सभा असल्याचं मुंडे म्हणाले. ही सभा बीडच्या विकासासाठी आहे. बीडचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी ही सभा आहे. बीड जिल्ह्याच्या खूप अपेक्षा आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असं कौतुक मुंडे यांनी केलं